कराड तालुक्यातील रेठरे प्रभागात राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने केला गावभेटी संपर्क दौरा
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
निस्वार्थ भावनेतून लोकसेवा करणारे तसेच एक संवेदनशील नेतृत्व म्हणून खा.श्रीनिवास पाटील यांना ओळखले जाते. समाजासाठी असलेल्या समर्पित वृत्तीमुळे त्यांना जिल्हावासिंयानी भरभरून प्रेम दिले. असे मत राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केले.
रेठरे (ता.कराड) विभागातील गोळेश्वर, कापिल, वडगाव हवेली, कोडोली, दुशेरे, शेरे, गोंदी, शेणोली, जुळेवाडी, खुबी, रेठरे खुर्द, रेठरे बुद्रुक याठिकाणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या विकासकामा संदर्भात कार्यपूर्ती संपर्क दौऱ्यातील गावभेटी प्रसंगी ते बोलत होते.
सारंग पाटील म्हणाले, खा.श्रीनिवास पाटील यांचा प्रशासनातला गाढा अभ्यास, लोकप्रतिनिधी म्हणून शेवटच्या टोकापर्यंत केलेले काम आणि सामान्य माणसांशी जुळलेली नाळ यामुळे त्यांचा सामाजिक प्रभाव मोठा आहे. प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने लोकांची कामे केली की लोक दखल घेतात. त्यामुळे एखाद्या नेत्यावर सामान्य माणूस किती प्रेम करतो हे खा.श्रीनिवास पाटील यांच्याकडे पाहिले की दिसून येते.
खा.श्रीनिवास पाटील यांच्याकडून जिल्ह्यातील विविध प्रश्न संसदेत मांडले गेले. त्यामुळे नागरिकांच्या अनेक प्रश्नांची सोडवून झाली. रेल्वे प्रकल्पग्रस्त नागरिकांना न्याय मिळून प्रकल्पात गेलेल्या जमिनींचा त्यांना चांगला मोबदला मिळाला. हायवेवरील मोठ्या पूलांची कामे झाली. मोठ्या संख्येने ग्रामिण व दुर्गम भागात मोबाईल टॉवरची कामे सुरू आहेत. जलजीवन मधून नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती मिळाली. केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठमोठी कामे होत असताना राज्य शासनाच्या योजनेतील विविध स्थानिक कामे मार्गी लागली. अनेक कोट्यावधींची विकासकामे तळागाळात पोहचली आहेत. त्यांच्या आभ्यासू नेतृत्वामुळेचं जनसामान्यांची कामे अगदी हक्काने होत आहेत. त्यातूनच त्यांचे व जनतेचे नाते अगदी घट्ट झाले आहे.
प्रारंभी स्वागत रामभाऊ सातपुते यांनी केले. आभार अभिजीत सोमदे यांनी मानले. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.