गहाळ झालेले पाच लाखांचे मोबाईल कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून मूळ मालकांना परत – changbhalanews
क्राइम

गहाळ झालेले पाच लाखांचे मोबाईल कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून मूळ मालकांना परत

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
महाराष्ट् तसेच इतर राज्यातुन चोरीस गेलेले व गहाळ झालेले 5 लाख रूपये किंमतीचे, एकुन 26 मोबाईल कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शोध घेवुन मूळ तक्रारदार यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांचे हस्ते परत केले आहेत.

पोलिसांकडील माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकुर यांनी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांना कराड शहर हे सातारा जिल्हातील एक मुख्य बाजापेठ असून पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल गहाळ होण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेवुन सदर मोबाईल तक्रारी बाबत गांभीयाने लक्ष देवून जास्तीत जास्त मोवाईल शोध घेवून परत करणेबाबत आदेशित केले होते. त्या अनुशंगाने वपोनि के. एन. पाटील यांनी कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार संग्राम पाटील यांना योग्य ते मार्गदर्शन करून सदरचे गहाळ झालेले मोबाईलचा तात्काळ छडा लावणेबाबत आदेश केला होता. त्यानुसार तात्काळ कारवाई करता महाराष्ट्र तसेच इतर विविध राज्यातुन गुन्हे प्रकटीकरण शाखेने एकुन 26 मोवाईल परत मिळवुन तक्रारदार यांना वपोनि के.एन. पाटील यांचे हस्ते परत केले.

कराड शहर ही सातारा जिल्हातील एक मुख्य बाजारपेठ आहे. त्यानुसार कराड शहरास एक मोठी ओळख आहे. कराड शहरात आजूबाजूचे गावातून दररोज हजारोचे संख्येने लोक नोकरी, रोजगार व शिक्षण व बाजारपेठ मध्ये खरेदी करण्यासाठी कराड शहरात ये-जा करत असतात. त्यावेळी प्रवासात बाजारपेठेत व इतर ठिकाणी मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे. सायबर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून तांत्रिक माहिती प्राप्त करून सदरची माहिती पोलीस अंमलदार संग्राम पाटील यांनी तांत्रिक विष्लेशन करत महाराष्ट्र राज्याच्या विवीध भागातून तसेच इतर राज्यातुन मोबाईल परत मिळवत गहाळ झालेले मोबाईल तक्रारदार यांना परत केल्याने नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत प्रशंसनीय भावना व्यक्त करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथक प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक गणेश कड, पोलीस हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, अशोक वाडकर, पोलीस नाईक अनिल स्वामी. पोलीस कांन्स्टेबल संग्राम पाटील, मुकेश मोरे, दिग्वीजय सांडगे, अमोल देशमुख, महेश पवार, धिरज कोरडे, मोहसिन मोमीन, समीर पठाण, आनंदा जाधव, हर्षल सुखदेव, सोनाली पिसाळ तसेच सातारा सायबर सेलचे अंमलदार महेश पवार यांनी केली आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close