उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा प्रश्न मार्गी लावू ; उदयनराजे भोसले
कृष्णा नदी शुद्धीकरण प्रकल्प हाती घेतला जाणार....
चांगभलं ऑनलाइन | सातारा
कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच व्हावे, या मागणीसाठी वकील संघटनेचा अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. या लढ्याला माझा पाठिंबा आहे. कोल्हापुर येथे सर्किट बेंच तयार करण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावू, अशी ग्वाही खा. श्नी. छ. उदयनराजे भोसले यांनी दिली.
विधीक्षेत्रातील मान्यवरांशी त्यांनी रविवारी संवाद साधला. याप्रसंगी एडवोकेट श्रीकांत केंजळे, एडवोकेट व्ही. ई. भोसले, एडवोकेट प्रशांत खामकर, एडवोकेट शिवाजीराव मर्ढेकर, एडवोकेट आबा पवार, एडवोकेट वसंतराव भोसले, एडवोकेट शामप्रसाद बेगमपुरे, एडवोकेट काका पाटणकर, एडवोकेट महेश कुलकर्णी, एडवोकेट महेश पाटील, एड़वोकेट विनीत पाटील आदी उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले, कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे सर्किट बँक मार्गे लावण्यासाठी राज्यशास्त्र सोबत बैठक घेऊन विधी खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे ते अत्यंत सकारात्मक विचाराचे आहेत. ते निश्चितपणे हा प्रश्न मार्गी लावतील. यामध्ये कुठल्याही प्रयत्नात मी कमी पडणार नाही. मी बोलतो ते करून दाखवतोच.
वकील चांगल्या पद्धतीने समाजाला शिस्त लावू शकतात, सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आयटी पार्क तयार करायचा आहे, असेही उदयनराजे यांनी सांगितले.
कृष्णा नदी शुद्धीकरण प्रकल्प हाती घेतला जाणार….
जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही कृषी उत्पादनावर आधारित आहे. शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. केंद्र शासनाने नमामि गंगे हा प्रकल्प हाती घेतला, त्यामध्ये आपल्या कृष्णा नदीचा देखील सर्वे करण्यात आला असून लवकरच केंद्र शासनाच्या माध्यमातून नदी शुद्धीकरण प्रकल्प हाती घेतला जाणार आहे, असेही उदयनराजे यांनी यावेळी सांगितले.