दि कराड अर्बन सेवक सहकारी पतसंस्थेकडून 12 टक्के लाभांश जाहीर ; द. शी. एरम मुकबधीर विद्यालयास संचालकांनी दिली 5 लाखांची देणगी – changbhalanews
Uncategorized

दि कराड अर्बन सेवक सहकारी पतसंस्थेकडून 12 टक्के लाभांश जाहीर ; द. शी. एरम मुकबधीर विद्यालयास संचालकांनी दिली 5 लाखांची देणगी

संस्थेची 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी

दि कराड अर्बन सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित., कराडची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पंकज मल्टीपर्पज हाॅल येथे रविवार दि. २८ रोजी उत्साहात पार पडली. या सभेत संस्थेचे अध्यक्ष सलीम शेख यांनी नफा वाटणीचा ठराव मांडून सभासदांसाठी १२ टक्के लाभांश घोषित केला. तर संचालकांनी द शि. एरम मूकबधिर विद्यालयास ५ लाखांची देणगी दिली.

सभेसाठी कराड अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे अध्यक्ष सुभाषराव एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, संस्थेचे मार्गदर्शक व संस्थापक अध्यक्ष सीए दिलीप गुरव व सर्व संचालक, संस्थेचे सभासद यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी संस्थेचे सचिव धनंजय अशोक शिंगटे यांनी प्रास्ताविक व सभेचे नोटीस वाचन केले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष सलीम शेख यांनी संस्थेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले, संस्थेची गेल्या चौदा वर्षातील वाटचाल ही दि कराड अर्बन को. ऑप बँक, दि कराड अर्बन ग्राहक संस्था, डॉ.द.शि. एरम अपंग सहाय्य संस्थेचे मुकबधीर विद्यालय, कराड महिला गृह उद्योग, इ. सहयोगी संस्थेतील सेवकांना आर्थिक उन्नती देणारी ठरली आहे. संस्थेचे सभासद ९४४ आहेत तर संस्थेचे भागभांडवल रक्कम रु. १ कोटी ७८ लाख आहे. संस्थेच्या ठेवी रक्कम रु. १२२९.०३ लाख आहेत. संस्थेचे ठेवीचे व्याजदर आकर्षक आहेत. तर कर्जे रक्कम रु. ८१५.०० लाख आहेत. संस्था एकूण व्यवसायाचा २० कोटीचा महत्वपूर्ण टप्पा पार करीत आहे. संस्थेने ३१ मार्च २०२४ अखेर ९ कोटी ८० लाखाची गुंतवणूक केलेली आहे. संस्थेकडे रक्कम रु. १७ लाखाचा सेवक कल्याण निधी उपलब्ध असून संस्थेला सन २०२३-२४ साठी नफा रक्कम रु.४७. ७४ लाख झालेला आहे. संस्था त्याचा लाभ पतसंस्थेच्या सभासदांना आर्थिक मदत देण्याकरिता करीत आहे. संस्थेला अहवाल सालात ऑडीट वर्ग” अ” मिळाला असून संस्थेचा NPA 0% असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या सर्व संचालकांनी सामाजिक बांधिलकी आणि कृतज्ञता म्हणून द. शि. एरम मुकबधीर विद्यालयास देणगी म्हणून रक्कम रु. ५ लाखाचा निधी दिला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सलीम शेख यांनी नफा वाटणीचा ठराव मांडून सभासदांसाठी १२% लाभांश घोषित केला.

सदर सभेस संस्थेचे संचालक गिरीश सिहासने, संदीप पवार, राजेंद्र कांबळे, संतोष गायकवाड, सौ. प्राची वैद्य, प्रदीप कदम, प्रशांत दळवी, अमर भोकरे, सौ. सुरेखा कुंडले, किरण मोटे, व्यवस्थापिका सबिना इनामदार उपस्थित होते. संस्थेस अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, अध्यक्ष सुभाषराव एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, तसेच नेहमीच संस्थापक अध्यक्ष सीए दिलीप गुरव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. संस्थेच्या या यशस्वी वाटचालीचे सर्वस्वी श्रेय आपल्या सभासदांना तसेच सेवक वर्ग यांच्या कृतीशील व कष्टपूर्ण योगदानाला आहे. आपला विश्वास, प्रेम, आपुलकी यामुळेच ही प्रगती उत्तम रीतीने सुरु आहे, असे संस्थेचे उपाध्यक्ष अतुल शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानताना आवर्जून सांगितले.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close