युवतीच्या तीन वर्षांपासूनच्या जटा सोडविल्या
डॉ. सुधीर कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांचा उपक्रम, : आत्तापर्यंत १२६ जटा निर्मूलन
चांगभलं ऑनलाइन | कराड
जटा निर्मूलन मोहिमेच्या अंतर्गत एकविस वर्षीय युवतीच्या तीन वर्षांपासून असणाऱ्या जटा घारेवाडीच्या शिवम प्रतिष्ठानमध्ये सोडविण्यात आल्या. जटा निर्मूलनाचे कार्य करणारे रयत विज्ञान परिषदेचे समन्वयक डॉ.सुधीर कुंभार व त्यांचे सहकारी अध्यापक अलकेश ओहळ, सुहास पाटील यांनी सलग दोन अडीच तास सलग काम करुन या जटा सोडविल्या. मूळ कर्नाटकातून स्थलांतर केलेल्या कुटुंबातील ही युवती आहे.
जटा सोडविण्यासाठी मानसिक तयारी झाल्यावर समुपदेशन केल्यानंतर या जटेचा गुंता सोडविण्यात आला. आतापर्यंत १२६ जटा सोडविण्यात आल्या असून त्यापैकी कोणत्याही व्यक्तींना पुन्हा कोणताही त्रास झाला नाही. यावेळी आनंदा खबाले, अरविंद इंगोले यांचेही सहकार्य मिळाले. एम.एन.रॉय संस्था कराड व शिवम प्रतिष्ठानचे सदस्य यात सहभागी झाले होते.
… अन् युवतीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले!
युवतीच्या मनावरील तणाव कमी झाल्याने आणि सर्व केस मोकळे झाल्याने तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले पहावयास मिळाले
– डॉ.सुधीर कुंभार
विज्ञान प्रसारक विद्यानगर , कराड.