चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात एकाच कुटुंबात गेली ४० वर्षे आमदारकी असूनही मतदारसंघाची अवस्था अत्यंत दयनीय का झाली आहे? या मतदारसंघात ते आमदार व मंत्री असताना मोठे, मोठे प्रकल्प का आले नाहीत? युवकांना रोजगार का मिळाला नाही? इतर मतदारसंघात कोट्यावधी रुपयाचा निधी येत असताना कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ वंचित का राहिला? असा थेट सवाल भारतीय जनता पार्टी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी करवडी ता. कराड येथील जाहीर सभेत केला.
भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील ७३ गावांमध्ये एकूण ५ कोटी इतका विकास निधी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे . तसेच भाजपच्या अनेक नेत्यांच्या माध्यमातून २०० कोटी पेक्षा जास्त विकास निधी देण्यात आला. त्याअंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, विधानसभा निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस व लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ, कराड उत्तर तालुकाध्यक्ष शंकरराव शेजवळ, जिल्हा उपाध्यक्ष सुरेशतात्या पाटील, कराड उत्तर संयोजक महेशकुमार जाधव, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, सातारा भाजपा जिल्हा पदाधिकारी सागर शिवदास व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या व मित्र पक्षांच्या माध्यमातून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासह सातारा जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. मात्र कराड उत्तरचे बिन कामाचे आमदार नको त्या कामाचे श्रेय घेण्यासाठी पुढे येत असून यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध करावा. या पुढील काळात कराड उत्तरचा आमदार हा भाजपाचाच असेल,असा विश्वास देखील कदम यांनी यावेळी व्यक्त केला.
मनोज घोरपडे म्हणाले, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात गावोगावी विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठा विकास निधी मिळत आहे. यापुढील काळातही संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने राहावे.
भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ म्हणाले, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात स्थानिक आमदारांनी कोणतेही काम न करता डांगोरा पिटवण्याचे उद्योग सुरू केले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांच्या माध्यमातून कराड उत्तरमध्ये कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आला असून आत्तापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त विकास कामे झाली आहेत. सर्व नागरिकांनी आता विकास कामे करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे.
यावेळी करवडीच्या सरपंच शालिनीताई पिसाळ, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश कुंभार, उपसरपंच संभाजी पिसाळ, नानासाहेब पिसाळ, अंतवडी गावचे सयाजी शिंदे, वाघेरी गावचे जयसिंग डांगे, बालम पटेल, वडोली गावचे बाळासो पवार, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर पवार, सुभाष जाधव, सोमनाथ पिसाळ, तंटामुक्ती अध्यक्ष पप्पू पिसाळ, तुकाराम नलवडे, गजानन तावरे, प्रमुख भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच करवडी परिसरातील ग्रामस्थ, महिला, युवक बहुसंख्येने उपस्थित होते.
भाजपाच्या माध्यमातून कराड उत्तरेसाठी २०० कोटींचा विकास निधी…
कराड उत्तर विधानसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तब्बल २०० कोटी रुपयांचा विकास निधी आला असून प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात झाली आहे. मतदारसंघातील कराड, कोरेगाव, खटाव, सातारा या चारही तालुक्यांमध्ये गावोगावी मोठा विकास निधी दिला गेला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, यांच्यासह मंत्री व पदाधिकाऱ्यांनी ‘कराड उत्तर’ वर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे यावेळी भाजप नेते व पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.