हॅपी थॉट्स तेजज्ञान फाउंडेशनच्या तेजरथाचे माजी नगरसेवक सौरभ पाटील यांनी केले स्वागत
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
हॅपी थॉट्स तेजज्ञान फाउंडेशन पुणेचे संस्थापक श्री तेजगुरू सरश्री यांच्या प्रेरणेने सातारा जिल्ह्यात आलेल्या “तेजरथ” चे विद्यानगर (कराड) येथे कराडचे माजी नगरसेवक सौरभ पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्वागत करण्यात आले.
यावेळी श्री चंद्रशेखर खेतमर, सौ. शितल खेतमर, सौ. वर्षाराणी पवार, हेमंत पवार, शिरसाळे सर, हिंगमिरे आदी उपस्थित होते.
कराड शहरामध्ये तेजज्ञान फाउंडेशनचे तेजस्थान वर्ग नगरपरिषद शाळा क्र ९ मधील आदरणीय पी. डी. पाटील साहेब सभागृह याठिकाणी घेतले जातात. तेथील तेजसेवक चंद्रशेखर खेतमर सरांनी फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणाऱ्या आध्यात्मिक कार्याविषयी माहिती दिली.
यावेळी माजी नगरसेवक सौरभ पाटील यांनी ग्रंथ खरेदी करून संस्थेच्यावतीने नगरपरिषद शाळा क्र ९ मधील आदरणीय पी. डी. पाटील साहेब सभागृह याठिकाणी नागरिकांसाठी मोफत घेण्यात येत असलेल्या “ध्यान वर्गा”बद्दल खेतमर सर व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन करून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.