Uncategorized
सौ. तेजल मंडले यांचे निधन

कराड, दि. ६ | चांगभलं वृत्तसेवा
बेलवडे बुद्रुक ता. कराड येथील रहिवासी सौ. तेजल उदय मंडले (वय ३४) यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. त्या जय मल्हार क्रांती रामोशी समाज संघटनेचे बेलवडे बुद्रुक शाखाध्यक्ष उदय शिवाजी मंडले यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पती, सासू, चुलत सासरे, चुलत सासू , दीर, भावजया, नणंदा, पुतणे -पुतण्या असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन विधी बेलवडे बुद्रुक तालुका कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीत सोमवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता होणार आहे.
सौ. तेजल मंडले यांचा स्वभाव प्रेमळ व मनमिळावू होता. त्या उच्चशिक्षित होत्या, पती उदय मंडले यांना त्यांनी खंबीरपणे साथ दिली. त्यांच्या निधनाबद्दल गावातील ग्रामस्थांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.