तांबवे सरपंचपदी सौ. निता बाबासो पवार यांची बिनविरोध निवड!

कराड, दि. ९ | चांगभलं वृत्तसेवा
कराड तालुक्यातील तांबवे ग्रामपंचायतीमध्ये भैरवनाथ ग्रामविकास आघाडीच्या सदस्या सौ. निता बाबासो पवार यांची गावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. गावच्या विशेष ग्रामसभेत निवडणूक अध्यासी अधिकारी प्रशांत कोळी यांनी ही घोषणा केली.
सन २०२० च्या निवडणुकीत माजी जि.प.सदस्य प्रदिप पाटील, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक स्व. पी.डी. (दाजी) पाटील, सह्याद्रीचे माजी संचालक रामचंद्र पाटील, कोयना बॅंकेचे संचालक अविनाश पाटील, दिलीपदादा पाटील, सतिश पाटील, दिनकर बाबर, माजी जि.प. सदस्या सौ. विजयाताई पाटील, माजी उपसरपंच प्रकाश पवार, अशोकराव पाटील, बाळासाहेब शिंदे, सुरेश पाटील, गुणवंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ ग्रामविकास आघाडीने सत्ता स्थापन केली होती.
आघाडीतील अंतर्गत ठरावानुसार, विद्यमान सरपंच सौ. जयश्री कबाडे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या विशेष बैठकीत सौ. निता बाबासो पवार यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब झाले.
ग्रामपंचायतीतील सर्व सदस्यांच्या एकमताने झालेल्या या निवडीबद्दल गावात समाधान व्यक्त होत असून, नूतन सरपंच सौ. पवार यांनी गावाच्या विकासासाठी सर्वसमावेशक कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.