१८ लर्षांनी भरला मोहननगर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा – changbhalanews
शैक्षणिक

१८ लर्षांनी भरला मोहननगर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

- जुन्या आठवणींना मिळाला उजाळा!

चांगभलं ऑनलाइन | पुणे
शाळा संपल्यावरच कळतं काय गंमत असते ती. तब्बल १८ वर्षांनी तोच शाळेचा अनुभव घेण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड, मोहननगर येथील श्रीमती गेंदीबाई ताराचंद हायस्कूल २००४-०५ बॅचचे विद्यार्थी सागर नेवाळे ,संदीप अलंकार, नितीन मोरे, किरण अडागळे, सुरेश फसाले आणि रोहीत सोनवणे यांच्या पुढाकाराने तीन महिन्यापूर्वी व्हटसअॅप ग्रुप तयार केला गेला. ‘चोपडा हायस्कूल सवंगडी मेळावा’ नावाचा ग्रुप बनविण्यात आला.

आजमितीला ७० जण या ग्रुपमध्ये समाविष्ट आहेत. सर्वानुमते ३ डिसेंबर २०२३ या दिवशी स्नेहभेटीचा कार्यक्रम ठरला. विविध कमिटी स्थापन करून कार्यक्रमाची जबाबदारी दिली गेली. रितसर सर्व शिक्षकांना घरी जाऊन निमंत्रणपत्रिका दिल्या. सदर कार्यक्रमास ४५ विद्यार्थी आणि १३ शिक्षक उपस्थित राहिले.

स्नेहमेळाव्यातील माजी विद्यार्थी प्रियांका काळे , सारिका एरनडोले , सोनाली पवार, योगेश कडलक, प्रशांत काळभोर , अशिष सातकर यांनी प्रातिनिधिक स्वरूपात बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. सर्वांना शालेय दिवसांची आठवण करून दिली. शाळेचे शिक्षक देवकाते सर, शिरसाठ सर, लोहार मॅडम, काळे सर, पाटील सर, शिगलगार मॅडम आणि काही शिक्षकांनी आपले अनुभव मांडले.

त्यानंतर सर्व शिक्षकांना या बॅचतर्फे सन्मान चिन्ह व रोपे देऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली गेली. तसेच शाळेलाही बॅटरी बॅकअप साऊंड भेट देण्यात आले. आलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शाळेची आठवण म्हणून एक स्मृतीभेट देण्यात आली. सर्वांनी पुन्हा एकदा स्नेहभोजनाचा आनंद एकत्रितरित्या घेतला. सर्वांचे एकत्रित फोटो हृदयाच्या कॅमेरामध्ये बंदीस्त केले गेले. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह आणि उत्कंठा ओसंडून वाहत होती. सर्वजण आपलं वय विसरून गेले होते. अखेर सायंकाळी पुन्हा लवकरच भेटण्याचं आश्वासन देऊन हेमंत जरे आणि माणिक शेलार, अमित वायाळ यांनी सर्वांचे आभार मानले. त्यानंतर एकमेकांना निरोप देत पुन्हा लवकरच भेटण्याचं आश्वासन देऊन स्नेहमेळाव्याची सांगता झाली.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close