नांदगाव येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या – changbhalanews
क्राइम

नांदगाव येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
नांदगाव, ता. कराड गावच्या हद्दीतील खडीगौण नावाच्या शिवारात करंजाच्या झाडाला एकाने नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शरद संपत माने वय 49 रा. काले, तालुका कराड असे मृताचे नाव आहे.

ही घटना रविवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास उजेडात आली. शरद यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यात येणार असून चौकशीनंतर आत्महत्येचे कारण समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. हवालदार दत्तात्रय तायशेटे तपास करत आहेत.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close