कराड-पाटण सोसायटीच्या उपाध्यक्षपदी दत्तात्रय जाधव यांची बिनविरोध निवड

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
जुने गावठाण सुपने ता. कराड शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक समितीचे खंदे समर्थक दत्तात्रय जाधव यांची कराड पाटण प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष बळवंत पाटील, समितीचे अध्यक्ष विश्वंभर रणवरे ,शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव,शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष दीपक भुजबळ, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष जहांगीर पटेल, शिक्षक समितीचे कराड तालुका अध्यक्ष अरुण पाटील यांच्या उपस्थितीत त्यांची निवड करण्यात आली.
त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष भालचंद्र थोरात, सातारा बँकेचे माजी उपाध्यक्ष मोहन सातपुते, सातारा बँकेचे माजी संचालक सुभाष शेवाळे, माजी अध्यक्ष शशिकांत तोडकर, दिनेश थोरात, रमेश देसाई, संजय नांगरे, अंकुश नांगरे, शिक्षक बँकेचे संचालक ज्ञानबा ढापरे, दत्ता पाटील यांनी अभिनंदन केले.
दत्तात्रय जाधव यांनी शिक्षक म्हणून भरीव काम केलेले आहे. अनेक विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत. तसेच शिक्षक समितीच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते अविरत परिश्रम घेतात. त्यांच्या संघटनात्मक कामामुळेच त्यांची उपाध्यक्ष या पदी वर्णी लागलेली आहे. त्यांच्या नेमणुकीमुळे शिक्षक समितीत आनंदाचे वातावरण आहे.