एन.डी.आर.एफ.चे पथक कराड येथे दाखल – changbhalanews
Uncategorized

एन.डी.आर.एफ.चे पथक कराड येथे दाखल

कराड | चांगभलं वृत्तसेवा
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने सातारा जिल्ह्यात मान्सून कालावधीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी एन. डी. आर. एफ. चे एक पथक तैनात केले असून हे पथक कराड येथे दाखल झाले आहे.

एन.डी.आर.एफ. पथकाचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कराडचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी स्वागत केले. या पथकामध्ये एकूण 25 व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये दोन अधिकारी व जवान यांचा समावेश आहे. जलद आणि तात्काळ मदत पोहोचविणे तसेच शोध व बचाव कार्य जलद गतीने होण्यासाठी या पथकाचा सातारा जिल्ह्याला उपयोग होणार आहे. एन. डी. आर. एफ. च्या पथकाकडे एकूण तीन बोटी असून त्याचप्रमाणे मान्सून कालावधीत उपयोगी होणारे सर्व शोध व बचाव कार्य इत्यादी साहित्यांचा समावेश आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close