यशवंत क्रांतीच्या कराड तालुकाध्यक्षपदी सुरेश गावडे

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
यशवंत क्रांती संघटनेच्या कराड तालुका अध्यक्षपदी श्री सुरेश गावडे यांचे निवड करण्यात आली तसे निवडीचे पत्र यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे साहेब यांच्या हस्ते सातारा जिल्हाध्यक्ष श्री उत्तम तांदळे यांनी मुंढे ता कराड येथील बिरोबा मंदिरात,मा. आनंदराव जागॄत जमाले, चेअरमन भैरवनाथ पाणी पुरवठा संस्धा व ग्रामपंचायत मुंढेचे माजी सरपंच, रमेश पांडुरंग लवटे , माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मुंढे, मनोहर शिंदे उपनगराध्यक्ष मलकापूर नगरपरिषद मलकापूर, सागर पाटील माजी सरपंच मुंढे, अक्षय मस्के, बिरु अनुसे, यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्यात देण्यात आले.
सुरेश गावडे हे मुंढे तालुका कराड जिल्हा सातारा येथील असुन ते यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात गेले अनेक वर्ष कार्यरत आहेत. कराड तालुक्यातील मेंढपाळ व धनगर समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमीच आवाज उठवत असतात. त्यांनी वारुंजी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली आहे. या गटात दोन गणांचा समावेश आहे पैकी वारूंजी आणि दूसरा कोयना वसाहत यासह चौदा गावांचा समावेश आहे आणि या चौदा गावां मध्ये त्यांचे सामाजिक कार्य आहे त्यांच्या या सामाजिक कार्याची व समाजाबद्दल असलेली तळमळ व संघटनेतील आज पर्यंत केलेले प्रामाणिक कार्य याची दखल घेऊन कराड तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी शिवाजीराव गावड़े विनोद गावडे, आकाराम पुकळे, अधिकराव येडगे, आनंदराव येडगे,दिनकर येडगे, महादेव येडगे, रमेश गावड़े, अक्षय गावडे , ज्ञानदेव येडगे, जगन्नाथ येडगे, विठ्ठल येडगे ( देवॠषी ), सोमनाथ येडगे, तसेच समाजबांधव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.