259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात 31 पैकी 30 नामनिर्देशनपत्रे वैध,1 अवैध

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या निवडणूक प्रक्रियेत 259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात काल नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत 28 उमेदवारांकडून 31नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली होती.आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सर्व नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली.त्यापैकी 30 नामनिर्देशनपत्रे वैध व एक नामनिर्देशनपत्र अवैध ठरवण्यात आले.
जसराज शामराव पाटील,रा.कराड,तालुका कराड यांनी राष्ट्रवादी(शरदचंद्र पवार) पक्षाकडून दाखल केलेले नामनिर्देशनपत्र पक्षाचा बदली उमेदवार म्हणून अवैध ठरवण्यात आले. नामनिर्देशनपत्रे माघारी घेण्याची मुदत दिनांक 4 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत आहे, अशी माहिती कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, लालासाहेब गावडे व डॉक्टर जस्मिन शेख यांनी दिली आहे.