सातारा–सांगलीत मुसळधार पाऊस; धरणांतून प्रचंड विसर्ग, नद्यांची पातळी धोक्याच्या उंबरठ्यावर

कराड, दि. १९, हैबत आडके | चांगभलं वृत्तसेवा
सातारा आणि सांगली जिल्ह्यात सलग मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढली असून धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. कोयना, मोरणा, कण्हेरसह सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांचे दरवाजे उघडण्यात आल्याने नदीपात्रे भरून वाहू लागली आहेत. परिणामी अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोयना धरणातून मोठा विसर्ग….
पाटण तालुक्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने आज दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८ वाजता सहा वक्र दरवाजे आठ फूटांवर उघडून ५१,२०० क्युसेक्स विसर्ग कोयना नदीत सोडण्यात आला.
पायथा विद्युतगृहातून : २१०० क्युसेक्स
एकूण ५३,३०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे.
मुळगाव पूल पाण्याखाली…
यामुळे मुळगाव येथील कोयना नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून परिसरातील गावांना पर्यायी मार्गाने (नवारस्ता–नेरळे) पाटणला यावे लागत आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कोयना धरण आजची स्थिती-
साठा : ९८.५७ टीएमसी (९३.६५ टक्के)
आवक : ६४,१९० क्युसेक्स (५.५४ टीएमसी)
पावसाचा आकडा (मिमी/एकूण) : कोयना – १९२/३६५८, नवजा – ३१६/४४३५, महाबळेश्वर – १५१/४२००
मोरणा धरण…..
मोरणा गुरेघर प्रकल्पातूनही मोठा विसर्ग सुरू आहे.
सद्यस्थिती : २१७९ क्युसेक्स (वक्र दरवाजे) + २०५ क्युसेक्स (सिंचन विमोचक) = २३८४ क्युसेक्स
सकाळी ७ वाजल्यापासून ४३०० क्युसेक्स विसर्ग, एकूण ४५०५ क्युसेक्स पाणी मोरणा नदीत सोडण्यात आले.
नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने इशारा दिला आहे की नदीपात्रात उतरू नये तसेच जनावरे पाण्यात नेऊ नयेत.
साताऱ्यातील प्रमुख धरणांमधील विसर्ग…
धोम बालकवडी – ४३०३ क्युसेक्स
धोम – ८६७१ क्युसेक्स
कण्हेर – ४२०४ क्युसेक्स
उरमोडी – २७१९ क्युसेक्स
तारळी – २७४४ क्युसेक्स
कोयना – ५३,३०० क्युसेक्स
वीर – २४,३०० क्युसेक्स
कण्हेर धरणातून वाढता विसर्ग….
कण्हेर धरणातील पाणलोट क्षेत्रात वाढत्या पावसामुळे सकाळी ११ वाजता विसर्ग ६२०० क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात येणार आहे.
सांडवा : ५३०० क्युसेक्स
विद्युतगृह : ७०० क्युसेक्स
त्यामुळे एकूण वेण्णा नदीत ६००० क्युसेक्स पेक्षा जादा पाणी सोडले जाणार आहे.
यामुळे हमदबाज-किडगाव व करंजे–म्हसवे पूल पाण्याखाली जाणार आहेत. संबंधित गावांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असा इशारा देण्यात आला आहे.
सातारा- सांगली जिल्ह्यातील नद्यावरील पूलांच्याजवळील पाणी पातळी (दि. १९ ऑगस्ट २०२५, सकाळी ८ वा.)…
कृष्णा पूल, कराड – १८’०६’’ (धोका पातळी ५५ फूट)
बहे पूल – १०’१’’ (धोका पातळी २३.७ फूट)
ताकारी पूल – २५’०’’ (धोका पातळी ४६ फूट)
भिलवडी पूल – २३’१०’’ (धोका पातळी ५३ फूट)
आयर्विन पूल – १८’९’’ (धोका पातळी ४५ फूट)
राजापूर बंधारा – ३०’४’’ (धोका पातळी ५८ फूट)
राजाराम बंधारा – ३४’९’’ (धोका पातळी ४३ फूट)
प्रमुख धरणातील पाणी साठा (टीएमसी) / विसर्ग (क्युसेक्स):…
कोयना धरण – ९८.५७ टीएमसी / ५३,३०० क्युसेक्स
वारणा धरण – ३२.१२ टीएमसी / २४,६३० क्युसेक्स
अलमट्टी धरण – ११३.७५७ टीएमसी (आवक – ८८,१२६ क्युसेक्स, जावक – १,५०,००० क्युसेक्स) .
सातारा व सांगली जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम असून धरणांतून वाढलेल्या विसर्गामुळे अनेक ठिकाणी नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.