
चांगभलं ऑनलाइन | पुसेगाव
बेकायदा गावठी पिस्तूल व तलवार भागणाऱ्या युवकास पुसेगाव पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी पिस्तूल व तलवार जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पुसेगावचे सपोनि आशिष कांबळे यांच्या पोलीस पथकाने केली आहे. अंकुश गणपत मदने रा. रामोशीवाडी, पुसेगाव, तालुका. खटाव असे अटक केलेल्या संशियताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुसेगाव चे सपोनि आशिष कांबळे यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती की, रामोशीवाडी पो. जाखणगाव ता. खटाव येथील
टेकवस्तीवर राहणाऱा अंकुश गणपत मदने हा त्याचे जवळ गावठी पिस्तूल व तलवार घेवून गावात वावरत आहे. त्यावरून पोलिसांनी मदने याच्यावर बारकाईने पाळत ठेवून त्यास शुक्रवार, दि. २० ऑक्टोबर रोजी रात्रौ १९.४५ वाजणेचे सुमारास त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे सखोल चौकशी केली. त्याच्याकडे घेतलेल्या झडतीत एक गावठी कटटा व तलवार अशी शस्त्रे मिळून आली. पोलिसांनी ती हस्तगत करून जप्त केली. तपासपथकातील सहाय्यक फौजदार धनंजय शिंदे यांनी संशयिताला अटक केली. याबाबत हवालदार श्रीनिवास सानप यांनी फिर्याद दिली आहे. सदरचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. बी. येवले करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक अंचल दलाल, उपाधीक्षक राजेंद्र शेळके यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. आशिष कांबळे, सहा. पोलीस उपनिरीक्षक धनंजय शिंदे, सुभाष शिंदे, पोलीस हवालदार श्रीनिवास सानप, पोलीस नाईक सुनिल अबदागिरे, प्रमोद कदम पोलीस कॉन्स्टेबल अविनाश घाडगे यांनी केली आहे.
साताऱ्यात ५३ पिस्तूले जप्त
पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा पोलीस दलाचा पदभार स्वीकारलेपासून नोव्हेंबर २०२२ ते आजपर्यंत अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी जिल्हयात एकूण २८ गुन्हे दाखल झाले असून त्यामध्ये ५३ पिस्टल / रिव्हॉल्वर व ५१ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ८३ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. अत्यंत कमी कालावधीत आत्तापर्यंतची ही रेकॉर्डब्रेक कामगिरी असून अशाच प्रकारची ठोस कारवाई जिल्हयात चालू ठेवणार असलेचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले आहे.
ही बातमी खालील व्हिडिओ पाहू शकता