सातारा लोकसभेसाठी दहा अपक्षांसह 16 जण मैदानात – changbhalanews
राजकिय

सातारा लोकसभेसाठी दहा अपक्षांसह 16 जण मैदानात

चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
45 सातारा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज भरलेल्या पाच जणांनी माघार घेतल्याने दहा अपक्षासह एकूण 16 जण निवडणूक लढवणार आहेत. या उमेदवारांना मिळालेली निवडणूक चिन्हे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बहाल केली आहेत.

उमेदवार, कंसात त्यांच्या तालुक्याचे ठिकाण , त्यांचे राजकीय पक्ष आणि मिळालेले निवडणूक चिन्ह पुढीलप्रमाणे – आनंदा रमेश थोरवडे (कराड) बहुजन समाज पक्ष – हत्ती , श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहराजे भोसले (सातारा) भारतीय जनता पार्टी कमळ, शशिकांत जयवंतराव शिंदे (कोरेगाव) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार – तुतारी वाजविणारा माणूस , कदम प्रशांत रघुनाथ (कराड) वंचित बहुजन आघाडी प्रेशर कुकर , तुषार विजय मोतलिंग (वाई) बहुजन मुक्ती पार्टी – खाट , सयाजी गणपत वाघमारे (कराड) बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी – शिट्टी , डॉ. अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले (सातारा) अपक्ष – कपाट , कोरडे सुरेशराव दिनकर (वाई) अपक्ष- ऑटो रिक्षा , गाडे संजय कोंडीबा (जावली) अपक्ष- तुतारी , निवृत्ती केरू शिंदे (सातारा) अपक्ष – चालण्याची काठी , प्रतिभा शेलार (सातारा) अपक्ष- गॅस सिलेंडर , बागल सदाशिव साहेबराव (सातारा) अपक्ष – दूरदर्शन , मारुती धोंडीराम जानकर (सातारा) अपक्ष – हिरा , विश्वजीत पाटील-उंडाळकर (कराड) अपक्ष- बॅट , सचिन सुभाष महाजन (खटाव) अपक्ष – फुगा , सीमा सुनील पोतदार (खटाव) अपक्ष – बॅटरी टॉर्च.

5 उमेदवारांची उमेदवारी माघार…

सातारा लोकसभा मतदार संघातून 5 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. अर्ज मागे घेणा-यांमध्ये चंद्रकांत जाणू कांबळे, दिलीप हरिभाऊ बर्गे, दादासो वसंतराव ओव्हाळ व सागर शरद भिसे, विठ्ठल सखाराम कदम यांचा समावेश आहे.

उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर

45- सातारा लोकसभा मतदार संघातील उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे जिल्हा खर्च नियंत्रण समितीकडे निवडणुक खर्चाची नोंदवही विहित वेळेत तपासून घ्यावेत, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहे.
45- सातारा लोकसभा मतदार संघातील उमेदवाराने प्रचार मोहिमेच्या कालावधीमध्ये किमान तीन वेळा तपासणीसाठी जिल्हा खर्च नियंत्रण समिती, सातारा येथे सादर करण्यासाठी एक तर व्यक्तीश: किंवा आपल्या निवडणूक प्रतिनिधीमार्फत किंवा त्यांने यथोचीतरित्या केलेल्या प्राधिकृत केलेल्या व्यक्तीमार्फत खर्चाची नोंदवही सादर करणे आवश्यक आहे.
उमेदवारांच्या लेख्यांची तपासणी करण्यासाठी पुढीलप्रमाणे वेळापत्रक निश्चीत करण्यात आले आहे. खर्च नोंदवहीची प्रथम तपासणी 26 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 5 यावेळेत होईल, द्वितीय तपासणी 30 एप्रिल रोजी 10 ते 5 तर तृतीय तपासणी ही 4 मे रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत जिल्हा नियंत्रण खर्च समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे खर्चाची नोंदवह्या तपासण्यात येतील.

वाई तालुक्यातील वृद्ध व दिव्यांग अशा 92 मतदारांचे घरी जाऊन 26 एप्रिलला मतदान घेतले जाणार…

सातारा लोकसभा मतदार संघाअंतर्गत वाई विधानसभा मतदार संघामध्ये 74 वृद्ध (85+) व 18 दिव्यांग मतदारांनी गृह भेटीतून मतदान करण्याचा पर्याय निवडला आहे अशा मतदारांचे गृहभेटीद्वारे दि. 26 एप्रिल 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान प्रतिनिधी आपल्या नेमणूक पत्रासह उपस्थित राहतील. नमुना 12 डी भरुन दिलेल्या मतदारांनी घरामध्ये उपस्थित राहून मतदान करावे. गोपनियतेचा भंग होणार नाही या पद्धतीने चित्रिकरण करण्यात येणार आहे. तरी सर्व 92 मतदारांनी 26 एप्रिल रोजी घरात उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहनही वाईच्या सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close