कराडला नवीन मतदार नोंदणीबाबत निवडणूक विभागाकडून प्रशिक्षण – changbhalanews
Uncategorized

कराडला नवीन मतदार नोंदणीबाबत निवडणूक विभागाकडून प्रशिक्षण

प्रशिक्षणात बीएलओ, पर्यवेक्षक, तलाठी, मंडळ अधिकारी पोलीस पाटील, ग्रामसेवक व कोतवाल यांचा सहभाग

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराडला महसूल प्रशासन तथा निवडणूक शाखेकडून २६० कराड दक्षिण व २५९ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील नवीन मतदार नोंदणीबाबत बैठक आयोजित बीएलओ यांच्यासह इतर घटकांना प्रशिक्षण देण्यात आले.
२६० कराड दक्षिण मतदार संघासाठी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे , तहसीलदार विजय पवार, कराडचे मुख्याधिकारी शंकर खंदारे, तसेच मलकापूचे मुख्याधिकारी व पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत ही प्रशिक्षण कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत बीएलओ , पर्यवेक्षक तलाठी , मंडल अधिकारी , पोलीस पाटील , कोतवाल , ग्रामसेवक यांनी नवीन युवा मतदार , दिव्यांग मतदार, सेक्स वर्कर व तृतीयपंथी यांची मतदार नोंदणी कशी करावी, याबाबतचे प्रशिक्षण घेतले.

२५९ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे , तहसीलदार विजय पवार, रहिमतपूरचे मुख्याधिकारी, खटावचे गटविकास अधिकारी, कोरेगावचे सहाय्यक गट विकास अधिकारी, सातारा येथील विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण कार्यशाळा झाली.

यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे तसेच तहसीलदार विजय पवार यांनी कार्यशाळेत सहभागी कर्मचारी अधिकारी यांना नवीन मतदार नोंदणीबाबत विविध सूचना केल्या.‌ त्या खालील प्रमाणे –

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यासाठी सुचना

१) विशेष मोहिम दिनांक २५/११/२०२३ व दिनांक २६/११/२०२३ रोजी होणार असुन मतदान केंद्रावर उपस्थित राहणे व अर्जाची स्विकृती करुन माहिती सादर करणे.
२) मतदान केंद्र परीसराचा सर्व्हे करुन नवीन मतदारांची मतदार नोंदणी करुन घेणे, तसेच मयत मतदारांची नावे मतदारयादीमधुन वगळणे.
३) पीएसई. व डीएसई सर्व्हेक्षण करणे व बीएलओ अॅपद्वारे Format A मधील मतदार कन्फर्मेशन लेटरचा फोटो अपलोड करणे. याबाबत पुढील कार्यवाहीबाबत आपणास पर्यवेक्षक यांच्या मार्फत सुचना देणेत येतील. मार्फत आपणास पुरविणेत आलेली
४) दिव्यांग मतदार नोंदणी दिव्यांग मतदारांची गाव निहाय यादी पर्यवेक्षक यांचे असुन सदर यादीतील आपल्या कार्यक्षेत्रातील दिव्यांग मतदार यांचेशी संपर्क साधून सदर मतदारांची मतदार नोंदणी B.L.O. App द्वारे दिव्यांग प्रकाराची नोंदीसह घेवुन १०० टक्के पुर्ण करणे व केले कार्यवाहीबाबतचा सोबत देणेत आलेल्या नमुण्यातील अहवाल पर्यवेक्षक यांचेमार्फत दिनांक ३०/११/२०२३ पर्यंत या कार्यालयास सादर करणे. ५) जन्म नोंदणीच्या याद्या या कार्यालयाकडून सर्व गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी यांना माहे जानेवारी २००४ ते माहे डिसेंबर २००६ या कालावधीतील जन्म नोंदणीची माहिती सादर करणेबाबत बैठक घेवुन सुचना देणेत आलेल्या आहेत. सदर यादी आपणास गाव निहाय देणेत येईल, सदर यादीचे अवलोकन करुन मतदान नोंदणी करणेवर शिल्लक असणा-या युवा मतदारांची मतदार नोंदणी दिनांक २५/११/२०२३ व दिनांक २६/११/२०२३ रोजीच्या विशेष मोहिमेमध्ये पूर्ण करुन त्याची माहिती विहीत नमुन्यात ‘ नमुन्यात पर्यवेक्षक यांचे मार्फत सादर करणे, सदर यादीतील १८ ते १९ वयोगटातील एकही मतदार शिल्लक राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

ग्रामसेवक व तलाठी, मंडल अधिकारी, कोतवाल, पोलीस पाटील यांच्याकरीता सुचना

१) ग्रामसेवक सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना आपल्यास्तरावरुन मागणीनुसार मयत दाखले विनामुल्य पुरविणेत यावेत. तसेच जन्म नोंदणीच्या यादया सर्व बीएलओ यांना पुरविणेत येवुन युवा मतदार नोंदणी १०० टक्के पुर्ण करुन घेणेसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करावे.

२) मंडल अधिकारी / तलाठी – १. सर्व बीएलओ यांना परीसरातील उच्च माध्यमिक व वरीष्ठ महाविदयालयातील प्राचार्य यांचेशी संपर्क साधुन मतदार नोंदणीकरीता शिबिर घेणेत यावे. २. भटक्या विमुक्त जाती / जमाती यांचे वस्तीवरती जावुन मतदार नोंदणी करुन घेणेत यावी व केले कार्यवाहीची माहिती या कार्यालयास छायाचित्रासह सादर करणे. ३. बहुतांश तलाठी यांची बी एल ओ म्हणुन नियुक्ती करणेत आलेली नाही, तरी आपल्या सजाअंतर्गत समाविष्ट सर्व बी एल ओ यांना मतदार नोंदणीसाठी मदत करणे.

३) पर्यवेक्षक – सर्व पर्यवेक्षक यांची सर्वात मोठी जबाबदारी असुन या कार्यालयाकडून वेळोवेळी देणेत येणारी माहिती व त्यांचे अहवाल या कार्यालयाकडुन तात्काळ सादर करणेची दक्षता घेणेत यावी. तसेच विशेष मोहिमांच्या दिवशी मतदान केंद्रावर बी एल ओ उपस्थित असलेची व्यक्तीशः खात्री करुन सायंकाळी ४.३० वा. पर्यंत माहिती सादर करणेची दक्षता घ्यावी. तसेच या पूर्वी दिनांक ४/११/२०२३ व दिनांक ५/११/२०२३ रोजी विशेष मोहिमेमधील सादर करणेत आलेल्या आकडेवारीनुसार संबंधित बीएलओ यांनी अर्जाची नोंदणी केली आहे अगर कसे याची पडताळणी करावी. तसेच बीएलओ यांना येणा-या तांत्रिक अडीअडचणीबाबत या कार्यालयातील संगणक ऑपरेटर यांचेशी संपर्क साधुन शंकानिरसन करणेत यावे. तसेच मागविणे आलेली माहिती विनाविलंब सादर करणेत यावी. तसेच बीएलओ यांचे
समवेत परीसरातील मतदार नोंदणीसाठी माहिती कँपचे आयोजन करावे.

४) पोलीस पाटील / कोतवाल आपण गावातील सर्व मतदार नोंदणी पासुन वंचित असणा-या मतदारांची माहिती संबंधित बीएलओ यांना देणेत यावी, व सदर मतदारांची नोंदणी झाली अगर कसे? याची वेळोवेळी माहिती घेणेत यावी.

५) सर्व गट विकास अधिकारी व मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्या कार्यालयाकडुन देणेत आलेल्या सुचनांनुसार मतदान केंद्रावरील अपुर्ण सोयी सुविधांची पुर्तता करुन घेणेत यावी. तसेच आपल्या कार्यालयातील बीएलओ म्हणून नियुक्त करणेत आलेल्या कर्मचारी यांना मतदार नोंदणी १०० टक्के पुर्ण करुन घेणेबाबत सुचना देणेत यावी. तसेच सर्व ग्रामसेवक व जन्म मृत्यु नोंदणी अधिकारी यांना मयत व जन्म नोंदणीचे दाखले संबंधित बीएलओ यांना मागणीनुसार देणेबाबत सुचना देणेत यावी, अशा सूचना प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे व तहसीलदार विजय पवार यांच्याकडून यावेळी देण्यात आल्या.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close