आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आशाकिरण वसतीगृहातील महिलांना साडी वाटप
- सर्वोदय गणेश मंडळाकडून सामाजिक उपक्रम

चांगभलं ऑनलाइन | मलकापूर प्रतिनिधी
कराड दक्षिणचे लोकप्रिय आ. डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वोदय गणेश व नवरात्र उत्सव मंडळ आगाशिवनगर मलकापूर कराड, यांच्यावतीने कराड येथील आशाकिरण महिला वसतीगृहामधील महिलांना साडी वाटप व खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना मलकापूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सुभाष वसंतराव माने म्हणाले की, आमचे नेते, सन्माननीय आमदार डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले यांचा वाढदिवस आम्ही नेहमी विविध उपक्रमांनी साजरा करत असतो. या वर्षी हा वाढदिवस एक सामाजिक उपक्रम म्हणून साजरा करण्याचा निर्णय आगाशिवनगर येथील आमच्या सर्वोदय गणेश मंडळांच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतला. त्यानुसार शासनाच्या आशाकिरण महिला वसतीगृहामधील गरजू महिलांना साडीवाटप व खाऊ वाटप करून एक सामाजिक बांधिलकी यानिमित्ताने जपली आहे. अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून तळागाळातीল गोरगरीब जनतेचे आशिर्वाद आमचे नेते आ. डॉ. अतुलबाबा यांच्या पाठीशी राहावे, व त्यांना दिर्घ आयुष्य लाभावे, अशी अपेक्षा माने यांनी व्यक्त केली.
यावेळी सर्वोदय गणेश व नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल संजय माने, उपाध्यक्ष अमर बागल, खजिनदार रोहीत सोनवणे, सतीश माने, संजय माने, दत्तात्रय हुमणे, दिगंबर पाटील, संकेत झेंडे यांच्यासह आशाकिरण महिला वसतीगृहाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.