कराडला ‘मनसे’चे इंग्रजी फलका विरोधात ‘खळखट्याक’ – changbhalanews
राजकियराज्य

कराडला ‘मनसे’चे इंग्रजी फलका विरोधात ‘खळखट्याक’

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी

कराड तालुक्यात दुकानांवरील इंग्रजी फलक काढुन त्या ठिकाणी मराठा फलक लावावेत अन्यथा खळखट्याक आंदोलन करू, असा इशारा काही दिवसांपूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र, याकडे दुकानदारांनी दुर्लक्ष केल्याने शनिवारी कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील एका दुकानावरील इंग्रजी फलक मनसेचे तालुका प्रमुख दादासाहेब शिंगण यांच्या नेतृत्वाखाली खळखट्याक आंदोलन करून फाडण्यात आला.

कराडच्या कोल्हापुर नाक्यावर असलेल्या एका ऑफिसचा इंग्रजी फलक मनसे तालुका प्रमुख दादा शिंगण यांनी शनिवारी आंदोलन करत फाडून टाकला. प्रशासन व दुकानदारांनी तत्काळ कार्यवाही करून मराठी पाटया लावाव्यात अन्यथा हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, असा इशारा त्यांनी दिला.

मनसेकडून मराठा पाट्याचे आंदोलन सुरू आहे. न्यायालयानेही महाराष्ट्रातील सर्व दुकाने व आस्थापनांना प्रथम मराठी भाषेत फलक असावा, असे निर्देश दिले आहेत. असे असतानाही अनेक दुकानांचे फलक इंग्रजीतच आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी मनसेच्यावतीने तहसिलदारांना निवेदन देत इंग्रजी पाटयांवर कारवाई करून मराठीत फलक लावण्याची मागणी करण्यात आली होती.

दरम्यान, मनसेच्या दादासाहेब शिंगण यांनी कोल्हापुर नाक्यावरचा एक आॅफिसचा इंग्रजी फलक फाडल्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close