आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणत जीवे मारण्याचा प्रयत्न करुन लुटणाऱ्या तीन सराईत गुंडाना अटक : कराड पोलिसांची कारवाई

चांगभलं ऑनलाइन. | कराड प्रतिनिधी
‘आम्ही इथले भाई आहोत’, असे म्हणत जीवे मारण्याचा प्रयत्न करुन लुटणाऱ्या तीन सराईत गुंडाना कराड शहर पोलिसांच्या डीबी पथकाने अटक केली आहे.
पोलिसांकडील माहिती अशी, कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून मलकापुर, आगाशिवनगर, मुजावर कॉलनी, बुधवार पेठ, ओगलेवाडी, सैदापुर मधील गुंडगिरी करणाऱ्यावर नजर ठेवली जात आहे.
या दरम्यान , दिनांक 01 मार्च 2024 रोजी कराड शहरात बुधवार पेठ कराड येथे एका इसमास कराड शहरातील सराईत गुडांच्या टोळीने ‘आम्ही इथले भाई आहे’ असे सांगून धमकावुन धारदार हत्याराने जीवे मारण्याचा प्रयत्न करत त्याचे जवळील रोख रक्कम लुटली होती. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांनी पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील व पथकास बोलावुन नमुद आरोपीस ताब्यात घेण्याबाबत आदेशीत केले.
त्यानुसार पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील व पथकाकडून तात्काळ पोलीस ठाणे हद्दीत आरोपी शोधकामी रवाना होवुन नमुद गुन्हयातील संशयित आरोपी अक्षय सोळवंडे, प्रद्युमन ऊर्फ पदया सोळवंडे राहणार बुधवार पेठ कराड ता. कराड जि सातारा, साईनाथ पुजारी रा. कृष्णा कॅनॉल कराड ता. कराड जि सातारा या संशयित आरोपीस कराड शहराचे विविध भागातुन शोध घेवुन अटक करुन त्यांचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेले हात्यार व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे करत आहेत. कराड शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील व डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांनी अशा प्रकारे गुन्हा करणाऱ्या सराईत गुंडाबाबत पोलीस ठाणेस निसंकोच तक्रार करण्याचे अवाहन करत इथुन पुढे कोणत्याही गुंडाची व बेकायदेशिर कारवाई करण्याऱ्या इसमांची गय केली जाणार नसल्याचे आश्वासन दिले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग अमोल ठाकुर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, सफौ रघुवीर देसाई, सफौ संजय देवकुळे, पोलीस हवा. शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक कुलदिप कोळी, संतोष पाडळे, पो.शि.अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे. महेश शिंदे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.