
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कृष्णा विश्व विद्यापीठ, कराड येथील स्पोर्ट्स फिजिओथेरपीस्ट व साताऱ्याचे सुपुत्र डॉ. प्रसन्नजीत प्रमोद निकम यांनी नुकतेच एका दिवसात 25 patents फाइल करून एकाच वेळी तब्बल तीन विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा बहुमान पटकावला.
त्यांनी फिजिओथेरपी क्षेत्रातील आपल्या वर्षानुवर्षांच्या संशोधनातून तयार केलेले विविध 25 इनोव्हेटिव्ह उपकरणांची नोंद patent च्या स्वरूपात दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी केली. “इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस” आणि “वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया” मध्ये एका वेळी 3 विश्वविक्रम केले.
याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांनी ह्याचे श्रेय त्यांचे वडील श्री. प्रमोद सुधाकर निकम, आई सौ. उल्हसिनी प्रमोद निकम, बहीण कु. मयुरी निकम, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश भोसले, रिसर्च डायरेक्टर डॉ. दिनेश अगरवाल, फिजिओथेरपी कॉलेजचे डीन डॉ. जी. वरधराजूलू, डॉ.जयंत पवार, डॉ. ऐश्वर्या बुलबुले आणि समस्त कृष्णा विश्व विद्यापीठाच्या स्टाफला दिले आहे.