सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जिल्हा सैनिक संरक्षण समितीची आढावा बैठक संपन्न

चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा येथे जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र सैनिक कल्याण विभाग उपसंचालक व सातारा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतेश हंगे(नि .) याच्या सहकार्याने आजी/ माजी सैनिक त्यांचे कुटुंबीय शहीद जवान कुटुंबिय यांना संरक्षण देण्याबाबत “सैनिक संरक्षण समितीची” आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकी दरम्यान आजी-माजी सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या खालील समस्या अडचणी विषयी चर्चा करण्यात आली.
1) जिल्हा पोलीस प्रमुख यांनी “सैनिक प्रथम” परिपत्रका अंतर्गत काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार प्रत्येक पोलीस स्टेशनला सैनिक कक्ष स्थापन करून कार्यान्वित करने व दर महिन्याला आढावा बैठक घेणे.
2) पोलीस महासंचालक यांच्या परिपत्रकानुसार आजी-माजी सैनिक,त्यांचे कुटुंबिय,शहीद जवान कुटुंबीय यांच्यावर पोलीस स्टेशनला होत असलेल्या खोट्या तक्रारी, खोटे गुन्हे दाखल होऊ नये. याच्यावर नियंत्रण करण्यासाठी प्रथमता होणाऱ्या तक्रारीची गुन्ह्याची संपूर्णपणे चौकशी व्हावी व चौकशी झाल्याशिवाय कोणतेही खोटे तक्रार, गुन्हे सैनिक व सैनिकांच्या कुटुंबावर दाखल होऊ नये याची अंमलबजावणी सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला करण्यात येईल व परिपत्रक काढण्यात येईल असे जिल्हा पोलीस प्रमुख यांनी सांगितले.
3) प्रत्येक महिन्याला तालुकास्तरावर तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मीटिंग घेण्यात येईल व त्या ठिकाणी जिल्हा संरक्षण समिती सदस्य माजी सैनिक तालुका प्रतिनिधी उपस्थित रहातील व आढावा घेण्यात येईल.
4) आजी/ माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय,शहीद जवान कुटुंबिय यांना ज्या पतसंस्था बँका व विविध एजंट, संस्था, असोसिएट, शेअर मार्केट, पोस्ट ऑफिस एजंट, व बिल्डर यांनी आर्थिक व्यवहारात फसवणूक केली असेल व विविध प्रकारचे आमिष दाखवून पैसे बुडवले असतील आशा सर्व प्रकारच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली व असे काही घडत असेल तर तात्काळ सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी जवळील पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करावी व असे फसवणाऱ्या वर तत्काळ कडक कारवाई केली जाईल असे सूचित करण्यात आले आहे.
5) जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी आजी-माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय शहीद जवान कुटुंबीय यांच्या समस्या,अडचणी विषयी 24 तासाच्या आत त्यांना निर्णय मिळावा व त्या तक्रारीवर कार्यवाही व्हावी यासाठी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी “सातारा पोलीस दक्ष ॲप” कार्यान्वित केले आहे त्याचा सर्व तालुक्यातून अहवाल मागवण्यात येईल, असे त्यांनी सूचित केले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय प्रतिनिधी, जिल्हा सैनिक कल्याण संघटक श्री दत्तात्रय फडतरे , सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व संरक्षण कमिटी सदस्य श्री प्रशांत कदम, (नि.) सुबेदार श्री. संजय निंबाळकर , श्री प्रवीण शिंदे, श्री सदाशिव नागणे, श्री. दिलीप बर्गे, श्री मस्कु शेळके, ,दीपक काकडे ,श्री. प्रशांत दुधाने, श्री विनायक जंगम, श्री आनंदा सोनवणे, श्री.दत्तात्रय मांढरे, सर्व तालुक्यातील माजी सैनिक उपस्थित होते.