काय काय हवं याबाबत रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितलं की..

Ramdas Athawale News | चांगभलं ऑनलाइन
महाराष्ट्रात तीन पक्षाचा सरकार असल्याचं सांगितलं जातंय. आरपीआयचं नाव कधी घेतलं जात नाहीये. त्यामुळे इतर पक्ष त्यांच्या सोबत आहेत, तिकडे दुर्लक्ष होता कामा नये आणि त्यामुळे लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करावा. आरपीआयला मंत्रीपदासोबतच दोन महामंडळ द्यावीत, लोकसभेचे शिर्डी आणि सोलापूर मतदारसंघ हे दोन मतदार संघ सोडावेत. शिर्डी मतदारसंघात मला स्वतः उभा राहण्याची इच्छा आहे, असे आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काल ठाणे येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
यावेळी रामदास आठवले म्हणाले, “महाराष्ट्रात तीन पक्षाचं सरकार असल्याचं सांगितलं जातंय. आरपीआयचं नाव कधी घेतलं जात नाहीये. त्यामुळे इतर पक्ष त्यांच्या सोबत आहेत, तिकडे दुर्लक्ष होता कामा नये आणि त्यामुळे लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करावा. त्यामध्ये मित्र पक्षांचा विचार करावा. आरपीआयला मंत्रीपद द्यावे आणि जी महामंडळ आहेत, त्याचा विस्तार करताना किमान दोन महामंडळं आरपीआयला द्यावीत, अशी आमची मागणी आहे.
आरपीआयला हवी शिर्डी, सोलापूरची जागा
भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारी बैठका सुरू आहेत. त्यांच्या बैठका झाल्या की आमच्याही बैठका होतील. लोकसभेबाबत आमच्या पक्षाची अशी भूमिका आहे की महाराष्ट्रात शिर्डी आणि सोलापूर या दोन जागा जर आरपीआयला मिळाल्या तर आमच्या पक्षाला महाराष्ट्रात मान्यता मिळू शकते. त्यामुळे त्याचा विचार करावा. आता रिपब्लिकन पक्षाचा मोठा मतदार वर्ग आहे आपल्या सोबत. त्यांची मतं मिळवणे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे लोकसभेसाठी आरपीआयला या दोन जागा देण्याबाबत विचार करावा. शिर्डी मतदारसंघात यापूर्वी मी लोकसभेची निवडणूक लढवली होती, त्यामध्ये माझा पराभव झाला होता. मात्र त्याच ठिकाणी आता पुन्हा उभा राहण्याची माझी इच्छा आहे. शिर्डी आणि सोलापूर हे दोन मतदारसंघ राखीव आहेत त्याचा विचार व्हावा, अशी आमची इच्छा आहे”, असं आठवले यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.