काशीळ, समर्थगाव उपसासिंचन योजनेसाठी मनोज घोरपडे यांच्या प्रयत्नांनी उरमोडी धरणातून पाणी आरक्षित
720 हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
काशीळ, समर्थगाव उपसासिंचन योजनेसाठी उरमोडी धरणातून पाणी आरक्षित करण्यात आल्याची माहिती कराड उत्तर निवडणूक प्रमुख तथा भाजपा नेते मनोज घोरपडे यांनी दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी मनोज घोरपडे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून 720 हेक्टर हून अधिक क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण तयार झााले आहे.
शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याच्या शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी मनोज घोरपडे हे सातत्याने काम करत आहेत. आजपर्यंत हणबरवाडी, धनगरवाडी पाणी योजना पुर्ण केली गेली आहे. लवकरच धनगरवाडीच्या पाण्याचे पुजन होणार आहे. तसेच तारळी धरणाचे पाणी कोपर्डी लिंक कॅनॉल द्वारे मसूर व कोपर्डे हवेली विभागासाठी दिले गेले आहे. लवकरच इंदोली व पाल उपसासिंचन योजना 50 मीटर वरून 100 मीटर हेड करण्यात येणार आहे. त्याचा सर्व प्रस्ताव मंत्रालयापर्यंत पोहचला आहे.
काशीळ उपसासिंचन योजनेसाठी उरमोडी धरणातून .063 TMC पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास 375 हेक्टर पेक्षा जास्त जमिन ओलीताखाली येणार आहे. या योजनेचा फायदा काशीळ, अतीत, हरपळवाडी या गावातील ज्या शेतीला पाणी मिळत नाही त्यांना पाणी मिळणार आहे. समर्थगाव (अतीत) उपसासिंचन योजनेसाठी उरमोडी धरणातून .058 TMC पाणी आरक्षित करण्यात आले आहे. या योजनेतून 345 हेक्टर पेक्षा जास्त जमिन ओलीताखाली येणार आहे. या योजनेचा फायदा समर्थगाव, अतीत, हरपळवाडी या गावांना होणार आहे. याच बरोबर गणेशवाडी उपसासिंचन योजनांचे टेन्डर लवकरच निघणार असून या माध्यमातून 791 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या योजनेचा फायदा गणेशवाडी, करंजोशी, सासपडे या गावांना होणार आहे. सासपडे मधील 50 मीटर हेड च्या वरील शेतीसाठी उपयोगात येणार आहे. तसेच उरमोडी कॅनॉलच्या वरील क्षेत्रासाठी उपसा करून पाणी देण्यात येणार आहे. या कामासाठी मनोज घोरपडे यांनी सातत्याने राज्यसरकारकडे पाठपुरावा केला होता.
दरम्यान, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, त्याचबरोबर कृष्णा खोरे विभागाचे जयंत शिंदे, काशीद, शेडगे यांचेही सहकार्य लाभले असल्याचे मनोज घोरपडे यांनी सांगितले.