क्राइम
आगाशिव डोंगरावरून पडुन युवकाचा मृत्यू

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
मलकापूर -जखिणवाडी ता. कराड येथील आगाशिव डोंगरावरून पडून कोयना वसाहत येथील 17 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. 26 जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याची सुमारास ही घटना घडली.
सोहम दिनकर शेवाळे (वय 17) रा. कोटणीस हॉल समोर, कोयना वसाहत ता. कराड असे मयत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी दिनकर रघुनाथ शेवाळे यांनी कराड शहर पोलिसात खबर दिली असून याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे.