
कराड | प्रतिनिधी
काले, या. कराड येथील गट नंबर 605 मध्ये असलेल्या उद्योगाचा आसपासच्या रहिवाशांना त्रास होत असल्याने या उद्योगावर कारवाई करावी, अशी मागणी संदीप थोरात आणि इतर रहिवाशांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे यांच्याकडे केली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे की, काले गावच्या हद्दीत कराड- चांदोली रस्त्याकडेला ओम इंडस्ट्रि नावाने वर्कशॉप सुरु आहे. हे वर्कशॉप 24 तास सुरु असते. या वर्कशॉपच्या आवाजामुळे शेजारी असलेल्या घराना त्रास होत आहे. याठीकाणी आवाज आणि वासामुळे राहिवाशी हैराण झाले आहेत. दरम्यान,
याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे आणि सातारा कार्यालयाकडेही तक्रार करण्यात आली आहे. या वर्कशॉपसाठी अनेक परवानग्या घेतल्या नसल्याने हे वर्कशॉप बंद करावे, अशी मागणी संदीप थोरात व इतर रहिवाशांनी केली आहे.