राज्य
महिला दिनानिमित्त महिलांना दिल्या भेटवस्तू ; घरनिकी ग्रामपंचायतीचा उपक्रम

चांगभलं ऑनलाइन | आटपाडी प्रतिनिधी
घरनिकी ( ता. आटपाडी ) ग्रामपंचायतींच्या मार्फत शुक्रवारी जागतिक महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायतीच्या मार्फत महिला दिनानिमित्त महिला मेळावा घेण्यात आला. त्यामध्ये आलेल्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू ग्रामपंचायतीकडून देण्यात आल्या. महिलांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळेतील शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, व इतर सर्व मान्यवरांसह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.