स्वसंरक्षण आणि लैंगिक शिक्षण: कराडच्या इनरव्हील क्लब कराड संगमचा विद्यार्थ्यांसाठी पुढाकार

कराड प्रतिनिधी, दि. ६ | चांगभलं वृत्तसेवा
इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम यांच्या वतीने अकॅडमी हाईट्स पब्लिक स्कूल, पाचवड फाटा, कराड येथे “गुड टच, बॅड टच आणि बेसिक सेल्फ डिफेन्स” या विषयावर एक महत्त्वपूर्ण व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात स्त्रीरोगतज्ञ डॉ. शैलजा कुलकर्णी यांनी विद्यार्थिनींना अत्यंत सोप्या आणि परिणामकारक पद्धतीने मार्गदर्शन केले. त्यांनी वास्तवातील उदाहरणे आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून योग्य आणि अयोग्य स्पर्श ओळखण्याचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच, अयोग्य परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत मूलभूत स्वसंरक्षण तंत्रांचे प्रशिक्षणही दिले.
“कळी उमलताना” या विशेष चर्चासत्रात किशोरवयीन मुलींना मासिक पाळीशी संबंधित समस्यांचे निराकरण आणि मार्गदर्शन करण्यात आले. या परस्पर संवादात्मक सत्रामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढला आणि वैयक्तिक सुरक्षिततेबाबत स्पष्टता निर्माण झाली.
या कार्यक्रमाला स्कूलचे सर्वेसर्वा संजय जाधव, रोहन जाधव आणि प्राचार्य जगदीपकुमार गाडे यांच्यासह शिक्षकवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट सारिका शहा यांनी क्लबच्या सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी प्रो.चेअरमन माहेश्वरी जाधव, संस्थापक अध्यक्षा छाया पवार, सचिव निमिषा गोर, सोनाली पाटील, तरुणा मोहिरे, वृषाली पाटणकर, मनीषा पाटील आणि सारिका कदम या क्लबच्या सदस्या उपस्थित होत्या.
क्लबच्या अध्यक्षा सारिका शहा यांनी शाळा प्रशासन, शिक्षकवृंद, विद्यार्थिनी आणि या प्रकल्पाला हातभार लावणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार मानले. हा उपक्रम विद्यार्थिनींना स्वसंरक्षण आणि लैंगिक शिक्षणाबाबत जागरूक करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरला.