कराडात मंगळवारी सुप्रसिद्ध व्याख्याते चंद्रकांत निंबाळकर यांचे व्याख्यान – changbhalanews
आपली संस्कृती

कराडात मंगळवारी सुप्रसिद्ध व्याख्याते चंद्रकांत निंबाळकर यांचे व्याख्यान

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सद्गुरू श्री वामनराव पै जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त मंगळवार दि‌.१९ रोजी कराड येथे ‘उत्कर्ष जीवनाचा, संकल्प समाज हिताचा’ या विषयावर सुप्रसिद्ध व्याख्याते चंद्रकांत निंबाळकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान लायन्स क्लब,रोटरी क्लब व सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट यांचे संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे सायं. ५ ते ७ या वेळेत होणार आहे.

मानवी जीवनातील दुःखाचे मूळ विचार प्रदूषण आहे.समाजामध्ये सर्व प्रकारचे प्रदुषण कमी करण्यासाठी दिव्य, सुंदर,शुभ, सकारात्मक विचाराचे प्रक्षेपण होणे आवश्यक आहे. सद्गुरु श्री वामनराव पै यांनी निर्माण केलेल्या विश्वप्रार्थनीमध्ये सकारात्मक विचार हाच रामबाण उपाय आहे. अशा विचाराने अनेक कुटुंबे सुखी झालेली आहेत. जिवन विद्या मिशनच्या माध्यमातून चंद्रकांत निंबाळकर यांनी हजारो लोकांना आपल्या सकारात्मक विचाररुपी व्याख्यानाने मंत्रमुग्ध केले आहे. हीच संधी आता कराड परिसरातील लोकांसाठी उपलब्ध होत आहे.

तरी या व्याख्यानासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे , असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close