माणदेशात दाखल झालेत ४५ परदेशी ‘पाहुणे’ – changbhalanews
निसर्गायन

माणदेशात दाखल झालेत ४५ परदेशी ‘पाहुणे’

माण, खटावच्या सौंदर्यात भर : ब्रिटिशकालीन देवापूर तलावावर हजेरी

मायणी प्रतिनिधी | गीता चव्हाण

ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १४३ वर्षापूर्वी माणगंगा नदीवर बांधलेल्या माण तालुक्यातील देवापूर येथील तलावास यंदा फ्लेमिंगो (रोहित,अग्नीपंख) या परदेशी पाहुण्यांनी हजेरी लावण्याचा पहिला ‘माण’ मिळाला आहे. तर खटाव तालुक्यातील सुर्याचीवाडी, येरळवाडी व मायणी तलाव अद्यापही फ्लेमिंगोच्या प्रतीक्षेत आहेत.

खटाव-माणमधील नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये थंडीच्या दिवसात छोट्या-मोठ्या पाणवठ्यावर पाणथळी पक्षी हजेरी लावतात.
माण तालुक्यातील पिंगळी व देवापूर तलावात फ्लेमिंगो पक्षांनी अनेकवेळा हजेरी लावली आहे. तर खटाव तालुक्यातील मायणी, येरळवाडी व सुर्याचीवाडी या तलावात परदेशी पाहूणे पक्षी कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावतात. सध्या माणमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने तलावात पुरेसा पाणीसाठा नाही. मात्र फ्लेमिंगोसाठी हा तलाव उदरनिर्वाहासाठी फायद्याचा ठरत आहे.

लांब गुलाबी पाय, केळीसारखी गुलाबी-काळी चोच, इंग्रजीतील एस आकारासारखी मान असे दिसणारे ४५ फ्लेमिंगो दलदलीच्या भागातील मासे, शैवाल व छोटे किटक शोधताना देवापूर तलावात दिसत आहेत.

खटाव माणच्या सौंदर्यात भर..
खटाव-माणमधील पिंगळी, देवापूर, कानकात्रे, सुर्याचीवाडी व येरळवाडीतील तलावात कमी जास्त प्रमाणात फ्लेमिंगो दाखल होतात. कमी पाण्यातील शैवाल व कवचधारी कृमी किटक खाण्यासाठी हे पक्षी तलावातील दलदलीच्या भागात दिसत असून यामुळे खटाव, माणच्या पक्षी सौंदर्यात भर पडली आहे.
अंकुश चव्हाण, पक्षीमित्र, मायणी ता.खटाव.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close