पंचशील अभ्यासिकेच्या उद्घाटनाने कराडच्या वाचन चळवळीला नवे बळ!
राजेंद्रसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांचा झंझावात | आणखी अभ्यासिका उभारणार

कराड प्रतिनिधी दि. ५ | चांगभलं वृत्तसेवा
गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वाटचालीला सक्षम पाठबळ देत कराड शहरात पंचशील अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले. शिवसेना नेते आणि यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून बुधवार पेठेतील नगरपालिकेच्या जागेत ही अभ्यासिका उभारण्यात आली आहे.
छोट्या घरांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावे, यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि समाजप्रेमाचे दर्शन यादव यांनी घडवले आहे. २५ लाख १७ हजार ८८४ रुपये खर्चून उभारलेली ही अभ्यासिका केवळ एक वास्तू नसून, ती शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य उजळणारे दालन ठरणार आहे.
उद्घाटनप्रसंगी यादव यांनी ठामपणे जाहीर केले की, “शहराच्या वाचन चळवळीसाठी जिथे जागा मिळेल तिथे अशाच अभ्यासिका उभारणार.” हा निर्धार केवळ घोषणाबाजीपुरता न राहता कृतीतून प्रकटत होत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले आहे.
<span;>वाचन चळवळीबरोबर विकासाचाही वज्रसंकल्प..
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला ‘शिका आणि संघटित व्हा’ हा मंत्र डोळ्यासमोर ठेवून आम्ही शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवू पाहत आहोत,” असे यादव म्हणाले.
बुधवार पेठ ही दाट लोकवस्तीचा भाग असून, छोट्या घरांमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य अभ्यासाचे वातावरण उपलब्ध करून देणे गरजेचे होते. या अभ्यासिकेच्या निमित्ताने कराडमध्ये वाचन संस्कृती रुजवण्याचे व्यापक अभियान सुरू झाले आहे.
यावेळी नगरसेवक निशांत ढेकळे, माजी सभापती विजय वाटेगावकर, सौ. स्मिता हुलवान, विनोद भोसले, प्रीतम यादव, राहुल खराडे, राजाभाऊ डुबल, आप्पासाहेब गायकवाड आणि राजकुमार लादे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
<span;>महायुतीकडून कराडसाठी आणखी शेकडो कोटींचा निधी येणार – यादव यांची ग्वाही
राजकारण ही केवळ खुर्च्यांची लढाई नसून लोकसेवेचा संकल्प असतो, हे राजेंद्रसिंह यादव यांनी त्यांच्या कार्यातून पुन्हा सिद्ध केले आहे.
“तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाठबळामुळे कराडसाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी मिळवता आला,” असे त्यांनी नमूद करत, यापुढेही महायुतीच्या माध्यमातून आणखी निधी मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला.
कराडच्या “विकास फेज-२” अंतर्गत स्मारके, अभ्यासिका, समाजमंदिरे व शाळांचे सुशोभीकरण अशी अनेक कामे हाती घेण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
<span;>यादव यांच्या पाठीशी जनता एकवटली आहे – राजकुमार लादे यांची भावना..
बुधवार पेठ परिसरात उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे सुशोभीकरण, महात्मा फुले पुतळा, अण्णाभाऊ साठे समाजमंदिर, आणि आता ही पंचशील अभ्यासिका – ही सर्व कामे म्हणजे यादव यांच्या कार्यक्षमतेची साक्ष आहेत.
“राजकारणातील गट-तट बाजूला ठेवून जनता यादव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे,” अशी भावना राजकुमार लादे यांनी व्यक्त केली.
याच कार्यक्रमात नगरपरिषद शाळा क्र. १० येथे ७ लाख ६९ हजार ६६४ रूपये खर्चून सिमेंट ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन देखील पार पडले.