
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत स्वराज्य निर्मितीसाठी लढलेल्या सरदारांच्या वंशजांतर्फे महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्नी. छ. खा. उदयनराजे भोसले यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज हे पुरोगामी विचारांचे राजे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिवरायांचा आदर्श घेऊनच राज्यघटनेची निर्मिती केली. सध्याच्या काळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचे विचार आचरणात आणून राज्यकारभार करत आहेत, त्यामुळे त्यांच्या पाठीशी राहणे आपले कर्तव्य आहे, अशा भावना यावेळी बारा मावळा सरदार घराण्यांच्यावतीने व्यक्त करण्यात आल्या.
बारा मावळा तर्फे ऐतिहासिक सरदार घराण्यातील श्री रवींद्र कंक, श्री बाळासाहेब सणस, श्री अमोल सणस, श्री गोरख देशमुख, श्री अनिकेत बांदल, श्री इंद्रजीत जेधे, श्री संदीप पोतनीस, श्री चंद्रशेखर बर्गे, श्री मारुती गोळे आदींनी उपस्थित राहून पाठींबा दिला.