कालेटेक ता.कराड येथुन चोरीस गेले स्टीलचा 3 तासात छडा आरोपीला वाहनांसह अटक : कराड ग्रामीणच्या डीबी पथकाची कारवाई

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कालेटेक ता. कराड येथुन चोरीस गेलेल्या स्टीलचा 3 तासात छडा लावून कराड ग्रामीण पोलिसांच्या डीबी पथकाने आरोपीला वाहनांसह अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांकडील माहिती अशी, पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आचंल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी सातारा जिल्ह्यातील सर्व अधिकारी यांना मिटींगमध्ये सुचना व मार्गदर्शन केले होते. दिनांक 02 मार्च 2024 रोजी तक्रारदार नामे विकास जगन्नाथ पाटील वय 50 वर्ष रा. कासेगांव ता. वाळवा जि. सांगली यांनी तक्रार दिली होती की, दिनांक 0 1 मार्च 2024 रोजीचे रात्री 10.00 ते दिनांक 02.03.2024 रोजीचे सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आमचे कालेटेक ता. कराड येथील डी.पो. जैन कंपनीचे गेटजवळ उघड्यावरील 90 हजार रूपये किंमतीचे दिड टन वजनाचे स्टिल अज्ञात आरोपीने चोरुन नेले आहे , म्हणून वगैरे तक्रारी वरुन कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सदरचा गुन्हा उघडकीस आणणोकामी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर व कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे सुचनेनुसार काल दि. 02 मार्च 2024 रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सचिन निकम, सज्जन जगताप, प्रफुल्ल गाडे, यांना मिळालेल्या बातमीनुसार त्यांनी पाचवड फाटा ता. कराड येथे सापळा लावला. त्यामध्ये नमुद गुन्हयातील संशयित आरोपी नामे सुखदेव सर्जेराव मोरे मुळ रा. भवानीनगर ता. बाळवा जि.सांगली सध्या रा. कालेटेक ता. कराड हा त्याचे ताब्यातील वाहन क्रमांक एम. एच. 50. एन. 5070 यामध्ये नमूद गुन्हयातील चोरीस गेलेला माल विक्री करणे करिता घेवून जात असताना त्यास तेथेच पकडुन सदर गुन्हयातील वापरलेले वाहन व मालासह एकुण 3 लाख 90 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपी याचे ताब्यातुन हस्तगत करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आचंल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर तसेच पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमलदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सचिन निकम, सज्जन जगताप, प्रफुल्ल गाडे यांनी केली असुन पुढील तपास हवालदार उत्तम कोळी करत आहेत.