अक्षय खेतमर यांचे तायक्वान्दो आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक लायसन परीक्षेत यश ; क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

कराड प्रतिनिधी , दि. १२ | चांगभलं वृत्तसेवा
तायक्वान्दो क्षेत्रात मोलाची भर घालत श्री अक्षय खेतमर यांनी वर्ल्ड तायक्वान्दोच्यावतीने घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल क्योरूगी तायक्वान्दो कोचिंग लायसन लेवल वन या परीक्षेत उत्तीर्ण होत उज्वल यश संपादन केले आहे. या आंतरराष्ट्रीय परीक्षेत जगभरातील 54 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
अक्षय खेतमर हे अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडू घडविणारे कुशल प्रशिक्षक असून स्वतःही तायक्वान्दोचे आंतरराष्ट्रीय पंच व खेळाडू आहेत. तायक्वान्दो क्षेत्रात त्यांनी मिळवलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या विशेष यशाबद्दल तायक्वान्दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष श्री संदीप ओंबासे, महासचिव श्री गफार पठाण, कोषाध्यक्ष श्री प्रसाद कुलकर्णी व सर्व पदाधिकारी, सातारा जिल्हा अम्याच्युअर तायक्वान्दो असोसिएशन चे अध्यक्ष श्री सुनील कोडगुले, सचिव श्री संतोष सस्ते, कोषध्यक्ष श्री गफार पठाण, उपाध्यक्ष श्री विजय खंडाईत तसेच कराड तालुका तायक्वान्दो असोसिएशन चे अध्यक्ष श्री अमोल पालेकर यांनी अक्षय खेतमर यांचे अभिनंदन केले.