बोगस नंबरप्लेट लावलेली चोरीची बुलेट कराड वाहतूक शाखेच्या ताब्यात – changbhalanews
क्राइम

बोगस नंबरप्लेट लावलेली चोरीची बुलेट कराड वाहतूक शाखेच्या ताब्यात

कराड | प्रतिनिधी
बोगस नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या एकाच त्याच्याकडील बुलेट सहकार्य वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची घटना शुक्रवार दिनांक 27 रोजी घडली.
याबाबत वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हवालदार अमोल तातोबा पवार यांना तसेच होमगार्ड जंगम यांना शुक्रवारी कराड शहरातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर वाहतूक सुरळीत करण्यासाठी नेमण्यात आले होते. सदर वेळी वाहतूक नियमन व वाहन चेकिंग करीत असताना संबंधित अमलदार यांनी समोरून येणारे ब्लॅक कलरची बुलेट वरील चालक यांना इशारा करून बाजूला घेतले, सदर चालकास त्याचे नांव व बुलेट बद्दल, तसेच तिचे कागदपत्राबाबत माहिती विचारली असता सदर चालक याने आपले नाव सलीम ईलाही डांगे वय 48 वर्षे, व्यवसाय वाहन खरेदी-विक्री रा. मसुर, जि सातारा असे सांगून बुलेटबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यामुळे बुलेट चारीची असावी असा संशय निर्माण झालेमुळे सदर बुलेट बाबत आरटीओ कार्यालय, कराड येथून पोलिसांनी सविस्तर माहिती घेतली असता, सदर बुलेटचा मूळ क्रमांक एम एच. 12 एम. डी. 0044 असा व बुलेटचे मूळ मालक निवृत्ती साहेबराव सुर्वे असल्याची माहिती मिळाली होती. अधिक माहिती घेता सदरची बुलेट चोरीची असून त्याबाबत फलटण शहर पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याबाबतची माहिती मिळाली. त्यामुळे संशयीताला त्याच्याकडील बुलेट शसह पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत पुढील योग्य ती कार्यवाहीसाठी फलटण शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि चेतन मछले , तसेच, पोलीस उपनिरीक्षक दिपक जाधव यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे हवालदार अमोल पवार, संजय मोरे, संतोष पाटणकर, होमगार्ड रविराज जंगम यांनी ही कारवाई केली आहे.

चांगभलं समूह

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close