भोसलेवाडीवर राष्ट्रवादीचा झेंडा – changbhalanews
Uncategorized

भोसलेवाडीवर राष्ट्रवादीचा झेंडा

श्री गोपालनाथ ग्रामविकास पॅनेलचा दणदणीत विजय

चांगभलं ऑनलाइन | उंब्रज
भोसलेवाडी ता. कराड येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक निवडणूकीत राष्ट्रवादीच्या श्री गोपालनाथ ग्रामविकास पॅनेलने सर्वच्या सर्व आठ पैकी आठ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व राखले आहे.

राष्ट्रवादी पुरस्कृत श्री गोपालनाथ ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व संदीप भोसले, जालिंदर भोसले, निशांत भोसले, दिनकर भोसले, दिलीप पवार, संपत भोसले यांनी केले.

श्री गोपालनाथ ग्रामविकास पॅनेल व परब्रम्ह गोपाळनाथ विकास आघाडी पॅनेल यांच्यात दुरंगी लढत झाली होती. श्री गोपालनाथ ग्रामविकास पॅनेलचे लोकनियुक्त सरपंच मारूती विजय ढेबे यांच्यासह अक्षय संजय भोसले, राजेंद्र गणपती कांबळे, सौ. उज्वला विकास भोसले, सौ.पुजा सचिन भोसले, सौ. लता दिपक होगाडे, राजेंद्र लहू भोसले, सौ. सजाबाई कचरू धावरे हे उमेदवार विजयी झाले आहेत.

तर विरोधी परब्रम्ह गोपाळनाथ विकास आघाडी पॅनेलला मोठया पराभवास सामोरे जावे लागले आहे. सर्व विजयी उमेदवारांचे माजी सहकारमंत्री आ. बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, खा. श्रीनिवास पाटील यांच्यासह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

 

गतवेळी निवडणूक झाली होती बिनविरोध.

भोसलेवाडी ग्रामपंचायतीत गत पंचवार्षिक निवडणूक ही ग्रामस्थांनी बिनविरोध केली होती. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत झाले होते. मात्र, यावेळी निवडणूक दुरंगी झाली आणि चुरस ही पहायला मिळाली.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close