नॅशनल लेव्हल ॲबॅकस स्पर्धेमध्ये कराडच्या ॲकॅडमीचे 27 विद्यार्थी यशस्वी – changbhalanews
शैक्षणिक

नॅशनल लेव्हल ॲबॅकस स्पर्धेमध्ये कराडच्या ॲकॅडमीचे 27 विद्यार्थी यशस्वी

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
ॲबॅकस ग्यान कंपनीमार्फत आयोजित नॅशनल लेव्हल ॲबॅकस ॲण्ड मेटल्‌‍ ॲरॅथमॅटिक कॉम्पीटिशनमध्ये चॅम्पीयन ॲबॅकस ॲकॅडमी कराड-मसूर येथील 27 विद्यार्थी यशाचे मानकरी ठरले. त्यांच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी बक्षिस वितरण समारंभ वेणूताई चव्हाण सभागृहात दिमाखात पार पडला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एसएमएस इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक संतोष गिरी, कार्यक्रमाच्या अध्यक्षा बालरोग तज्ज्ञ डॉ. सौ. क्षमा जाधव, इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा ज्येष्ठ समाजसेविका रेखा काशिद, अंकुर क्लिनिकच्या डॉ. नयना शहा, संत तुकाराम विद्यालयाच्या शिक्षिका सौ. माधवी काशिद आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. माधवी काशिद यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चॅम्पियन ॲबॅकस ॲकॅडमीच्या सीईओ सौ. ज्योती देशमाने यांनी केले. प्रमुख पाहुणे, विद्यार्थी, पालक उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत चॅम्पियन ॲबॅकस ॲकॅडमीच्या संचालिका सौ. ज्योती देशमाने यांना एव्हिडन्स ऑफ एक्सलन्स अवॉर्ड मिळाला. तसेच या स्पर्धेची नोंद वर्ल्ड रेकॉर्डबुकमध्येही झाली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदनही करण्यात आले.

चॅम्पियन ॲबॅकस ॲकडमीचे यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे – चॅम्पीयन ऑफ द चॅम्पीयन- सिद्धी भुतकर, चॅम्पीयन ऑफ द चॅम्पीयन साईराज धस, चॅम्पीयन ऑफ द चॅम्पीयन मृणाल गुरव, चॅम्पीयन श्लोक शहा, श्लोक जैन, पवित्रा अनगडकर विवेक चिकने, उत्तेजनार्थ पहिला ओम शेलार, सोहम जांभळे, अर्णव कटारे, यशवर्धिनी लाड, सानवी शिंदे. उत्तेजनार्थ दुसरा नील कदम, अंश सरगडे, सम्यक शहा, वाहिब सुतार, स्वराज पवार, राजवीर जगदाळे, श्लोक पाळ, गीत पानसे, उत्तेजनार्थ तिसरा प्रणवी भंडारे, समर्थ राजमाने, समर्थ जगदाळे, सहभागी समर्थ सावंत, श्रीवल्लभ भुतकर, अमन खान, दक्षा पाटील, या सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. चॅम्पीयन ॲकॅडमीच्या मसूर शाखेच्या सौ. स्नेहल जाधव यांनी संर्वांचे आभार मानले‌.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close