सुवर्णा विठोळे कराड दक्षिण तालुकाध्यक्षपदी, विजयस्तंभ बचाव समितीची नवीन नियुक्ती जाहीर – changbhalanews
Uncategorized

सुवर्णा विठोळे कराड दक्षिण तालुकाध्यक्षपदी, विजयस्तंभ बचाव समितीची नवीन नियुक्ती जाहीर

कराड, दि. 22 जून 2025 | चांगभलं वृत्तसेवा
कोरेगाव भीमा विजयस्तंभ बचाव समितीच्या कराड दक्षिण तालुकाध्यक्षपदी सुवर्णा विठोळे यांची निवड करण्यात आली. तसेच, कराड शहर अध्यक्षपदी वनिता कांबळे, तर शहर उपाध्यक्षपदी कोमल शिंदे यांची नियुक्ती झाली. या नियुक्त्या नुकत्याच कराड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत जाहीर करण्यात आल्या.

या बैठकीस समितीचे प्रदेश संघटक सचिव प्रा. दिलीप लोखंडे अध्यक्षस्थानी होते. जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांनी तालुका व शहर पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करत नविन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. निवडीनंतर नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.

बैठकीस वैभव कांबळे, दिनकर कांबळे, मनिषा कांबळे, दिलीप आहिरे, अरविंद गायकवाड, विद्या वाडते यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रसंगी प्रा. दिलीप लोखंडे यांनी कार्यकर्त्यांना कोरेगाव भीमा विजयस्तंभाचा इतिहास व त्याचे सामाजिक-सांस्कृतिक महत्त्व समजावून सांगितले. तर आनंदराव लादे यांनी सातारा जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही लवकरच समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या जातील, असे सांगितले.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close