राज्य
घरनिकी ग्रामस्थांकडून सुहासभैया बाबर यांचा सत्कार
चांगभलं ऑनलाइन | आटपाडी प्रतिनिधी
आ. अनिल भाऊंच्या विशेष प्रयत्नातून टेंभू योजनेच्या विस्तारीत सहाव्या टप्प्याची निविदा निघाल्याबद्दल घरनिकी येथील ग्रामस्थांनी भेटून सांगली जि. परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान नियोजन समिती सदस्य सुहासभैया बाबर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी घरनिकी गावचे सरपंच हेमंत हणमंत पवार, उपसरपंच जावेद काझी , आरपीआय कलाकार संघटनेचे
अध्यक्ष सुनिलभाऊ तोरणे (पोतराज), माजी उपसरपंच गणेश पवार, माजी सरपंच सलीम शेख, माजी उपसरपंच आप्पासो पवार, कैलासशेठ पवार, माजी सरपंच विक्रमभाऊ दाइंगडे, शिवाजी येळे, संपतराव पाटील, अशोक दाइंगडे, गोरख गारळे, ईलाई शिकलगार, भास्कर माने, माजी चेअरमन गणपत पवार, रामचंद्र नामदेव पवार, रामचंद्र खंडू पवार, भारत तोरणे, सचिन एवळे आदी मान्यवर उपस्थित होते.