श्री सिध्देश्वर गणेश मंडळाचा रौप्य महोत्सव उत्साहात साजरा
इतिहास अभ्यासक अतुल मुळीक, शिक्षक प्रकाश पाटील यांचा झाला सन्मान

चांगभलं ऑनलाइन | इस्लामपूर प्रतिनिधी
वाटेगाव ता. वाळवा येथील सिद्धेश्वर गणेश मंडळाची स्थापना 2000 साली झाली. हे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. खास महिलांच्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम राबविण्यात आले. रौप्य महोत्सव उत्साहात साजरा झाला.
यामध्ये पहिल्या दिवशी लहान मुला-मुलींचे खेळ संगीत खुर्ची, लिंबू चमचा, स्लो सायकलिंग, दुसऱ्या दिवशी भक्ती तरंग फैजुल पटेल प्रस्तुत कुंडलवाडी यांचा सदाबहार गीतांचा कार्यक्रम, तिसऱ्या दिवशी राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार प्राप्त प्रा. दीपक सर्जेराव तडाखे सर यांचा होम मिनिस्टर महिलांसाठी खास पैठणी साडी मनोरंजक कार्यक्रम, चौथ्या दिवशी संमोहनशास्त्र हास्याचा तुफान धबधबा रवी बावडेकर यांचा हिप्नोटाइज कार्यक्रम, पाचव्या दिवशी श्री वासुदेव महिला भजनी मंडळ वाटेगाव यांचा कार्यक्रम आणि रवी कदम महाराज यळगावकर यांचे प्रवचन झाले.
शेवटच्या दिवशी गावासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या दरम्यान ग्रामदैवत वाटेश्वर मंदिर जीर्णोद्धार समितीच्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला. मंडळाच्यावतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे वाटेगावचे पोलीस पाटील संतोष करांडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्रीकृष्ण नलवडे , शैक्षणिक व सामाजिक कार्यात सहभागी असणारे आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रकाश तानाजी पाटील, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, सध्या देशसेवेत असणारे व निवृत्त फौजी, इतिहास अभ्यासक अतुल मुळीक, शहीद सुरेश मुसळे व झाकीर पठाण यांच्या मातोश्री या सर्वांचा शाल, श्रीफळ, वृक्ष देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
होम मिनिस्टर खेळ पैठणीचा तसेच सर्व स्पर्धांमध्ये सहभागी महिलांना व विविध स्पर्धांमधून क्रमांक प्राप्त विजेत्यांना मंडळाकडून आकर्षक भेट देण्यात आली.
या कार्यक्रमादरम्यान कार्यक्रमांमध्ये विशेष सहभाग असणारे बाल कलाकार नारायणी गौरव पाटील , निळकंठ जयसिंग पाटील व ज्येष्ठ महिला सुमन तानाजी पाटील, कमल संभाजी नलवडे, सुनंदा सुभाष नलवडे, लता अर्जुन भानुसे, शिला सुभाष पाटील, दिपाली जाणकार, शोभा रघुनाथ चव्हाण, विद्या अधिक पाटील या सर्वांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
शांतता व सुव्यवस्था राखत भक्तीमय वातावरणात मंडळाचे अध्यक्ष राहुल पाटील, सह माजी अध्यक्ष, संस्थापक, खजिनदार व मंडळाचे सर्वच सदस्य यांनी रौप्य महोत्सवी वर्ष उत्साहात पार पाडले.