परिवर्तन यात्रेला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद कराड उत्तरेत बदल घडवेल – रामकृष्ण वेताळ – changbhalanews
राजकिय

परिवर्तन यात्रेला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद कराड उत्तरेत बदल घडवेल – रामकृष्ण वेताळ

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी

भाजपाच्यावतीने आयोजित परिवर्तन यात्रेला ओगलेवाडी परिसरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद कराड उत्तरेत बदल घडवेल आणि विधानसभेत नवीन चेहरा पाहण्याची संधी उत्तरेतील मतदारांना मिळेल, असे प्रतिपादन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी व्यक्त केले. ते शामगाव ता.कराड येथे परिवर्तन यात्रेत बोलत होते. विधान परिषद सदस्य योगेश टिळेकर, भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे, सागर शिवदास यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीच्यावतीने कराड उत्तरमध्ये परिवर्तन यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे. ही परिवर्तन यात्रा कराड उत्तर मतदारसंघातील चारही तालुक्यांमध्ये फिरत आहे. सध्या ही यात्रा ओगलेवाडी परिसरात असून ठिकठिकाणी या यात्रेचे जंगी स्वागत होत आहे. शामगाव येथे ही यात्रा आली असता मार्गदर्शन करताना रामकृष्ण वेताळ म्हणाले , संपूर्ण कराड उत्तर मतदारसंघात लोकांचा यात्रेला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. विकासाच्या कामाची वाढलेली गती, आणि मिळत असलेला प्रचंड मोठ्या प्रमाणावरील निधी यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. म्हणूनच यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी बोलताना योगेश टिळेकर म्हणाले, यावेळी भाजपाला साथ द्या. कराड उत्तर हा मतदारसंघ विकासात अग्रेसर होईल. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोज घोरपडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

लोकांनीही आपल्या समस्या आणि अडीअडचणी या नेत्यांच्या समोर उपस्थित केल्या. तसेच शामगाव पाणी योजनेसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल रामकृष्ण वेताळ यांचे कौतुक केले जात आहे. अनेक वर्ष पाण्यासाठी धडपडणाऱ्या शामगावकरांचा पाणी प्रश्न कोणीही व्यवस्थित हाताळला नव्हता, रामकृष्ण वेताळ यांनी सतत चार वर्षे यासाठी प्रयत्न केले आणि हा प्रश्न मार्गी लावला. याबद्दल लोकांनी जाहीर आभार व्यक्त केले. या परिवर्तन यात्रेत शामगाव, पाचुंद, मेरवेवाडी, वाघेरी, करवडी या परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती.

या परिसरातील भाजपचे नेते जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य संजय घोरपडे , तालुका अध्यक्ष शंकर शेजवळ, बाजार समितीचे संचालक राजेंद्र चव्हाण, लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्ष दिपाली खोत , महिला मोर्चा अध्यक्ष सीमा गार्गी , नवीन जगदाळे , शहाजी मोहिते,  तुकाराम नलावडे, सुमित शहा, रघुनाथ शेडगे, जयसिंग डांगे, सयाजी शिंदे , सचिन शिंदे , अक्षय भोसले, पायल जाधव , माजी उपसरपंच बाळासाहेब पोळ, मुरलीधर पोळ, ग्रामपंचायत सदस्य राहुल यादव, योगेश फाटक आणि कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close