ब्रह्मदास विद्यालयात राजारामबापू, अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांना अभिवादन

कराड प्रतिनिधी, दि. १ | चांगभलं वृत्तसेवा
बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथील कासेगाव शिक्षण संस्थेच्या ब्रह्मदास विद्यालयामध्ये लोकनेते राजारामबापू पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारुती मोहिते होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून भगवानराव मोहिते उपस्थित होते. प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. बी. माने, तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते सर्व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस शिक्षक पी. टी. पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्याध्यापक जे. बी. माने यांनी प्रास्ताविक करताना राजारामबापू पाटील यांच्या समाजकार्याचा आढावा घेतला. त्यांनी लोकमान्य टिळक यांचे राष्ट्रप्रेम व अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक व सामाजिक योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
विद्यार्थी मनोगत मधून श्रावणी यादव, अंकिता शिंदे, दक्षा कुंभार, कार्तिकी थोरात, संकल्प मोहिते, ओम मोहिते, श्रीवर्धन मोहिते, समर्थ मोहिते, आराध्या थोरात, श्लोक थोरात, कार्तिकी थोरात, स्वामींनी डुबल, राजेश्वरी मोहिते, ईश्वरी थोरात, अमृता माने यासह २५ विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान मोहिते, ग्राम शिक्षण समिती सदस्य अंकुश मोहिते, जयवंतराव मोहिते, भरतसिंह मोहिते, उत्तम मोहिते, रमेश मोहिते, संजय मोहिते, दिलीप मोहिते, आप्पासो मोहिते, प्रकाश मोहिते, आनंदराव मोहिते, सुभाष तडाके यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुजा मोहिते, सृष्टी मोहिते यांनी तर आभार जी. व्ही. रणदिवे यांनी मानले.
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीवा निर्माण करण्याच्या दृष्टीने या अभिवादन कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे, अशी प्रतिक्रियाही शिक्षक व उपस्थित मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली.