कराडमध्ये भाजपकडून आयोजित योगशिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कराड, दि. 22 | चांगभलं वृत्तसेवा
जागतिक योग दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष कराड शहराच्यावतीने दोन ठिकाणी भव्य योगशिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांचे आयोजन भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. भाजपा मंडल अध्यक्षा सौ. सुषमा लोखंडे आणि संयोजक एकनाथ बागडी यांच्या पुढाकारातून हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले.
शिबिर आवटे कॉम्प्लेक्स, कार्वे नाका व एम. आर. ओसवाल हॉल, सोमवार पेठ येथे एकाचवेळी आयोजित करण्यात आले होते. या योगशिबिरांना कराडकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमावेळी माजी नगरसेविका सौ. विद्याताई पावसकर, प्रमोद शिंदे, अजय पावसकर, राहुल आवटे, मंजिरी कुलकर्णी, धनश्री रोकडे, भारती शिंदे, सुमन बागडी, सुरेखा सूर्यवंशी मॅडम, सुजाता मुठेकर, जनाबाई जाधव, राजश्री कारंडे, सौ. मोहिते, सरिता हरदास, प्रीती मुंढेकर, मीना लोहार, सोपान तावरे, राजेंद्र खोत, रमेश मोहिते, विनायक घेवदे, कृष्णा रैनाक, अभिषेक भोसले, नितीन भोसले, सागर माने, संतोष मुठेकर, सतीश लोहार, संजय मुठेकर, शैलेश गोंदकर, सागर, विशाल आणि इतर अनेक योगप्रेमी उपस्थित होते.
या शिबिरांमध्ये योग शिक्षक बापू देसाई, योग शिक्षक नेनमलजी ओसवाल, एकनाथ बागडी आणि सायली भिसे यांनी उपस्थितांना योगसाधना, श्वसन तंत्र आणि मानसिक स्वास्थ्य याविषयी प्रभावी मार्गदर्शन केले. शहरातील नागरिकांनी योग दिनानिमित्त घेतलेल्या सहभागामुळे आरोग्यविषयी जनजागृती वाढल्याचे चित्र या कार्यक्रमांमधून दिसून आले.