रेकॉर्डवरील सराईताकडून कराड, सातारा व कोल्हापुरातील चोरी, घरफोडीचे गुन्हे उघड – changbhalanews
क्राइम

रेकॉर्डवरील सराईताकडून कराड, सातारा व कोल्हापुरातील चोरी, घरफोडीचे गुन्हे उघड

कराड ग्रामीणच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
रेकॉर्डवरील सराईतास अटक करून सातारा, कराड शहर व कोल्हापूर जिल्ह्यात त्याने केलेले चोरी, घरफोडीचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. विशाल संभाजी पवार वय 25 वर्ष रा. उमराणी ता. जत जि. सांगली असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे ‌. त्याच्याकडून एक चोरीची मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे. ही कामगिरी कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील अधिकारी यांना मोटारसायकल चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत मिंटीग मध्ये सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने कराडचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकुर व कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस अलर्ट केले होते.

या अनुषंगाने कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सज्जन जगताप, सचिन निकम, प्रफुल्ल गाडे, मोहित गुरव यांचे पथक हे दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना नांदगाव गावातील ग्रामस्थांनी फोन करुन एक संशयीत इसम फिरत असलेबाबत कळवले. त्यामुळे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस पथक तातडीने नांदगाव गावात पोहचले असता एकजण संशयीत विना नंबरप्लेटचे मोटारसायक्लवरुन जाताना दिसला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने आपले नाव विशाल संभाजी पवार वय 25 वर्ष रा. उमराणी ता. जत जि. सांगली असे असल्याचे पोलिसांना सांगितले. मोटारसायकलबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी रेकॉर्डवरील माहितीची खात्री केली असता संशयित विशाल पवार याच्यावर सांगली, सोलापुर, नाशिक जिल्ह्यात चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. कसून केलेल्या चौकशीत त्याने त्याच्याकडील मोटारसायकल ही सातारा शहर पोलीस स्टेशन हद्दीतुन चोरी केली असल्याचे पोलिसांना सांगितले. सदर मोटरसायकल चोरीचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या ताब्यातील 60 हजार रुपये किंमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करून त्याच्यावर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, संशयित विशाल पवार यांच्याकडे केलेल्या चौकशी त्याने कराड शहर पोलीस स्टेशन हद्दीत दि.11 ऑगस्ट 2024 रोजी मंगळवार पेठेतील प्रसन्न मेडीकलचे दुकान फोडुन रोख रक्कम चोरी केल्याची पोलिसांना कबुली दिली. या घरफोडीचा गुन्हा कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. अधिक चौकशीत आठ दिवसापुर्वी त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेडीकल दुकान फोडुन चोरी केली असल्याचे समोर आले. पोलिसांनी अटक केलेल्या संशयितास कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या चौकशीकामी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास हवालदार नितीन येळवे करत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक समीर शेख , अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकुर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शनाखाली नांदगाव दूरक्षेत्राच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सज्जन जगताप, सचिन निकम, तानाजी बागल, प्रफुल्ल गाडे, मोहित गुरव, गणेश बाकले यांनी केली.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close
WhatsApp Group
16:53