राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त शेणोलीत २५ औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण
अकलाई देवी ऑक्सिजन पार्क ग्रुपचा पर्यावरण आणि समाजहिताचा अभिनव उपक्रम!

कराड, दि. २८ | चांगभलं वृत्तसेवा
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शेणोली गावात पर्यावरणस्नेही आणि सामाजिक संदेश देणारा एक आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात आला. अकलाई देवी ऑक्सिजन पार्क ग्रुप, शेणोली यांच्या वतीने ताम्हण, अर्जुन, पांगारा, कळंब, तबोबिया, पिलमोहर अशा २५ आयुर्वेदिक औषधी वृक्षांची लागवड करण्यात आली.
या वृक्षारोपणाचा खास आकर्षण ठरलं ते म्हणजे, “झाडाच्या नावानं… चांगभलं!” अशा घोषणांनी दिलेला हरित संदेश! प्रत्येक झाड लावताना उत्साहात आणि आनंदात ही घोषणा देण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात सकारात्मक ऊर्जा आणि पर्यावरण जपण्याचा संदेश पसरला.
अकलाई देवी ऑक्सिजन पार्क ग्रुप गेल्या काही वर्षांपासून पावसाळी लागवड, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण जनजागृतीसाठी सातत्याने कार्यरत आहे. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त झाडे लावून त्यांच्या विचारांना अभिवादन करण्याची प्रेरणादायी परंपरा त्यांनी सुरू ठेवली आहे.
या उपक्रमात गावकरी, महिला, युवक आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. “झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा!” या घोषवाक्यासह शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय व समतेच्या विचारांना हिरव्या अभिवादनात उजाळा देण्यात आला.
📰 “आपल्या गावाची, आपल्या मनातली बातमी – फक्त चांगभलं न्यूजवर!”
📲 खालील प्लॅटफॉर्मवर आम्हाला Follow / Subscribe करा: 📷 Instagram ▶️ YouTube 🐦 X
📘 Facebook 🗞️ Dailyhunt
❤️ Like करा ↗️ शेअर करा 🔔 रहा अपडेट