शेकापचा शनिवारी कवठेमहांकाळ येथे विभागीय मेळावा
सातारा जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहणार

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
शेतकरी कामगार पक्षाचा सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा शनिवार दिनांक 7 जून रोजी होणार आहे. या मेळाव्यासाठी शेकडो कार्यकर्ते सातारा जिल्ह्यातून उपस्थित राहणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष एडवोकेट भाई समीर देसाई दिली आहे
या मेळाव्यास शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस मा. आमदर जयंतभाई पाटील, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख सांगोला, मा. आमदार बाळाराम पाटील, एस व्ही जाधव सर ,पक्षाचे खजिनदार अतुल म्हात्रे, तसेच महाराष्ट्रातील नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात शेतकरी व कामगारांच्या विविध प्रश्नांवर ठराव मंजूर करून पुढील चळवळीचे नियोजन करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीही यावेळी होणार आहेत. या मेळाव्यास सातारा जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते जाणार असल्याचे अशी जिल्हाध्यक्ष एडवोकेट भाई समीर देसाई यांनी म्हटले आहे.