शशिकांत शिंदे यांना भरघोस मताने निवडून आणणार ; कराड दक्षिण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकारणीचा निर्धार
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार शशिकांत शिंदे यांना भरघोस मताने निवडून आणण्याचा निर्धार कराड दक्षिण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकारणीच्या येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला.
महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचार कामाची रणनीती ठरवण्यासाठी कराड दक्षिण (Karad Dakshin) शिवसेना ShivSena (Uddhav Balasaheb Thackeray) कार्यकारणीची बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम, कराड दक्षिण प्रचार प्रभारी साहिल शिंदे, उपजिल्हा प्रमुख नितीन काशीद, तालुका संपर्क प्रमुख मिलिंद गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना पक्ष कार्यालय मलकापूर येथे पार पडली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद, महिला आघाडी संघटिका अनिताताई जाधव, तालुका प्रमुख शशिकांत हापसे, दिलीप यादव, शहर प्रमुख मधुकर शेलार, शशीराज करपे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बैठकीस संबोधित करताना उमेदवाराचे प्रतिनिधी सुपुत्र साहिल शिंदे म्हणाले की “शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) हे चळवळीतील नेतृत्व असून सतत कार्यरत असणारे व सर्वांना 24 तास उपलब्ध असणारे व्यक्तिमत्व आहे.सातारा लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी व लोकशाही बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय शशिकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी सर्व घटक पक्ष व शिवसैनिकांनी प्रयत्न करून विजयश्री खेचून आणावी.
या बैठकीत शिवसेना कराड दक्षिण कार्यकारणीतील पदाधिकारी व शिवसैनिक यांना संबोधित करताना जिल्हाप्रमुख हर्षद कदम म्हणाले की ” कराड दक्षिण हा पुरोगामी विचाराचा व निष्ठावंतांचा बालेकिल्ला असून प्रत्येक वेळी कराड दक्षिणने सातारा जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कराड दक्षिणमध्ये शिवसेनेची फळी बळकट व मजबूत असून पदाधिकारी व शिवसैनिकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करावी.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद म्हणाले की ”कराड दक्षिण मतदार संघातील प्रत्येक जिल्हा परिषद निहाय शिवसैनिकांची फळी असून महाविकास आघाडीच्या घटक पक्षाशी समन्वय साधून गावनिहाय प्रचारात उतरून सातारा लोकसभेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवू. ”
यावेळी जिल्हा संघटिका अनिताताई जाधव यांनीही महिला आघाडीच्या माध्यमातून मतदार संघात प्रचार यंत्रणा राबवणार असल्याचे सांगितले .
या बैठकीस उपतालुकाप्रमुख संजय चव्हाण अनिल चाळके, सौरभ कुलकर्णी, ऋषिकेश महाडिक, उपशहर प्रमुख साजिद मुजावर , शेखर बर्गे, निलेश सुर्वे , कराड शहर संघटक अजित पुरोहित, मलकापूर शहर संघटक विजयानंद पाटील, ओमकार काशीद, विभाग प्रमुख प्रवीण लोहार , किरण चौरे , अमोल कणसे , संगीता जाधव, नितीन शिंदे, महेश पवार, नरेंद्र लोहार, मिलिंद गुंजाळ, दिनकर चोरगे, कविताताई यादव, कृष्णतः बोडरे सर्जेराव रेंदाळकर , उपविभाग प्रमुख विविध गावातील शाखाप्रमुख तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आभार मधुकर शेलार यांनी मानले.