मैदान
कराड तालुका कुस्ती स्पर्धेत शर्वरी जाधवचे यश

चांगभलं ऑनलाइन | कराड
येथील शिवाजी आखाडा येथे पार पडलेल्या स्व. खाशाबा जाधव तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत ४० किलो गटांमध्ये प्रेक्षणीय कुस्त्या करीत पै. शर्वरी सचिन जाधव ( जाधवमळा, आटके ) हिने द्वितीय क्रमांक पटकावला .
शर्वरीला तहसीलदार मधुसूदन बर्गे, आरटीओ चैतन्य कणसे यांचे मार्गदर्शन लाभले. शर्वरी ही शेणोली कुस्ती केंद्र मध्ये एनआयएस कुस्ती कोच पै. संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत.